कोल्हापूर | महाराष्ट्र कर्नाटक सीमेवर आज कर्नाटक पोलिस आणि शिवसैनिक यांच्यात संघर्ष पहायला मिळाला. भगवा झेंडा कर्नाटकात घेऊन जाणार्या शिवसैनिकांना भाजप सरकारकडूने अडवल्याने सीमाभागात वाद उफाळून आला आहे.
बेळगाव महापालिकेसमोरुन कर्नाटकच्या भाजप सरकारने भगवा झेंडा हटवला आहे. यानंतर मराठी भाषीक आणि कन्नड भाषिक यांच्यात वाद उफाळून आला आहे. महाराष्ट्रातील शिवसैनिकांनी हिंदूंचा भगवा झेंडा बेळगावात भडकवण्याचा निर्णय घेतला. कोल्हापूर जिल्ह्यातील शिवसैनिक सीमा पार कडून बेळगावकडे निघाले असता त्यांना कर्नाटक पोलिसांनी सीमेवर अडवले आहे. शिणोली गावाजवळ शिवसैनिक आणि कर्नाटक पोलिस यांच्यात जोरदार धक्की बुक्की झाली आहे.
दरम्यान, बेळगावात जाऊन भगवा झेंडा फडकवणारच असा पवित्रा शिवसैनिकांनी घेतला आहे. सीमा भागात यामुळे ताणावग्रस्त वातावरण बनले आहे. शिवसैनिक सीमेवर ठिय्या करुन मांडून बसले आहेत. बेळगावात आम्ही भगवा झेंडा फडकवणारच यावर शिवसैनिक ठाम आहेत. यावर आता कर्नाटक सरकारकडून काय भुमिका घेतली जाते हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘Hello News’