शिवसेनेच्या बंडखोर आमदारांच्या प्रतिकात्मक पुतळयांना मिरचीची धुरी

0
55
Shiv Sena's Agitation
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सातारा प्रतिनिधी । शुभम बोडके

शिवसेनेच्या बंडखोर आमदारांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व शिवसेनेशी बंडखोरी केल्याने शिवसैनिक चांगलेच आक्रमक झाले आहेत. बंडखोर आमदारांविरोधात ठिकठिकाणी निषेधही करण्यात आला आहे. याचे पडसाद सातारा जिल्ह्यातही उमटले. साताऱ्यातील खटाव तालुक्यात शिवसैनिकांनी शिवसेनेच्या बंडखोर आमदारांच्या प्रतीकात्मक पुतळ्यांना उलटे टांगून त्यांना मिरच्यांची धुरी देत आंदोलन केले.

शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांच्या वतीने सुरुवातीला खटाव तालुक्यातील वडूज येथील चौकात एकत्रित येत करत बंडखोर आमदारांच्या निषेधार्त जोरदार घोषणाबाजी देण्यात आली. त्यानंतर पक्षप्रमुख तथा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासोबत असल्याचे आंदोलकाने जाहीर केले आहे.

वडूज या याठिकाणी करण्यात आलेल्या शिवसैनिकांच्या आंदोलनावेळी तालुकाप्रमुख शहजीराजे गोडसे, महिला संघटनेच्या उपतालुका प्रमुख सलमा शेख यांच्यासह तालुक्यातील शिवसेना पदाधिकारी व शिवसैनिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here