सातारा प्रतिनिधी | सकलेन मुलाणी
दुष्काळी भागात वीज पुरवठा खंडित करू नका असे सांगूनही वीजतोडण्यास आलेल्या अधिकाऱ्यांच्या गाडीवर शिवसैनिकांनी झेंडा लावला. पुसेगांव (ता.खटाव) शिवसैनिकांनी अधिकाऱ्यांच्या गाडीवर दगडफेक करून चांगलेच सुनावले. शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी घेतलेल्या या आक्रमक भूमिकेमुळे अधिकाऱ्यांना तेथून पळ काढावा लागला तसेच घटनास्थ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.
लॉकडाऊन व अवकाळी पावसामुळे शेतकरी चिंताग्रस्त आहे. अर्थिक मोठे नुकसान झाले आहे. वीजतोडणीच्या विरोधात शेतकरी नव्हता, मात्र मुदत देण्याची शेतकरी करत आहे. लोकांनी अर्थिक अडचणीमुळे मुदत मागत होते. परंतु अधिकारी जबरदस्तीने वीजतोडणी करत होते. त्यामुळे आज त्यांना जशास तसे उत्तर शिवसेनेच्या वतीने देण्यात आल्याचे शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी सांगितले.
पुसेगांव येथे वीज तोडण्यासाठी चारचाकी गाडीतून अधिकारी फिरत होते. बाजारपेठेत शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी गाडी अडवून अधिकाऱ्यांना खाली उतरण्यास सांगतिले. यावेळी काही कार्यकर्त्यांनी गाडीवर दगडफेक केली असल्याने गाडीचे नुकसान झाले. तसेच अधिकाऱ्यांच्या गाडीला शिवसेनेचा झेंडा लावला. घटनास्थळी अधिकारी व शिवसैनिक यांच्यात शाब्दीक बाचाबाची सुरू असताना तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.
सातारा जिल्ह्यासह राज्यातील सर्व महत्वाच्या ब्रेकिंग बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आमचा WhatsApp ग्रुप Join करा
Click Here to Join Our WhatsApp Group