…आता ठाकरे सरकारने इच्छाशक्ती दाखवावी; विनायक मेटेंचा टोला

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सध्या 102 वी घटना दुरुस्ती केल्यानंतर त्याच्या विधेयकाला लोकसभा व राज्यसभेत मंजुरी देण्यात आली आहे. त्यामुळे मराठा आरक्षणाचा मार्ग मोकळा झाला आहे. यावरून आता शिवसंग्राम सन्घटनेचे नेते विनायक मेटे यांनी ठाकरे सरकारवर निशाणा साधला आहे. “आता ठाकरे सरकारने इच्छाशक्ती मराठा आरक्षणासाठी इच्छाशक्ती दाखवावी,” असा टोला मेटे यांनी लगावला आहे.

यावेळी मेटे म्हणाले की, आता दोन्ही संसदेत घटना दुरुस्तीचे विधेयक मंजूर करण्यात आले आहे. त्यामुळे आता मराठा समाजाला मागास ठरविण्यासाठी ठाकरे सरकारने पुढाकार घ्यावा. राज्य मागासवर्गीय आयोगात जे जातीय लोक आहेत त्यांना हटवावे. नाही तर जातीय अन्याय होऊ शकतो. तसेच राज्य मागासवर्गीय आयोगात सर्व जातीच्या सदस्यांचा समावेश करण्यात यावा, अशी मागणी यावेळी मेटे यांनी केली आहे.

मराठा तसेच ओबीसी समाजाच्या आरक्षणावरून शिवसंग्रामचे नेते विनायक मेटे यांच्याकडून महाविकास आघाडी सरकारवर टीका करण्यात आली. यावेळी मेटे यांनी राज्यसभेत मराठा आरक्षणाचे घटना दुरुस्ती विधेयक मंजूर करण्यात आल्यानंतर ठाकरे सरकारवर निशाणा साधला.