शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांनी घेतला लसीचा दुसरा डोस

औरंगाबाद : शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांनी आज, बन्सीलालनगर आरोग्य केंद्रात कोरोना लसीचा दुसरा डोस घेतला. यापूर्वी  ८  मार्च रोजी पहिली लस घेतली होती. जगभरात आलेले कोरोनाचे संकट लवकरच दूर होईल,  मात्र तत्पूर्वी सर्वांनी उपयोजनाचे पालन करावे. मास्क वापरणे,  हात धुणे,  अंतर ठेवणे या त्रिसूत्रीचा वापर करावा. तसेच सर्वांनी लसीकरण करावे, असे आवाहन शिवसेना नेते माजी खासदार चंद्रकांत खैरे यांनी यावेळी केले.

यावेळी माजी महापौर नंदकुमार घोडेले, ऍड. आशुतोष डंख,  माजी नगरसेवक गजानन बारवाल,  नगरसेवक सचिन खैरे, मनपाच्या  डॉ. उज्वला भांबरे व आरोग्य कर्मचारी यांच्यासह नागरिकांची उपस्थिती होती. यावेळी खैरे यांनी सर्व नागरिकांनी आता लस घेणे आवश्यक असल्याचे सांगितले.

शहरात कोरोना रुग्ण संख्या झपाटयाने वाढत असताना आता प्रत्येक घराघरात नागरिकांनी स्वतःची काळजी घेणे गरजेचे झाले आहे. त्यासाठी ठिकठिकाणी लसीकरण केंद्रे सुरु करण्यात आलेली आहेत. त्याच माध्यमातून नागरिकांनी सर्वांनी लस घ्यावी, असे आवाहन खासदार खैरे यांनी केले आहे.