“सूक्ष्म उद्योग खात्यामुळे त्यांचं डोकंही सूक्ष्म झालं”; गुलाबराव पाटलांचा राणेंवर हल्लाबोल

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्याकडून जन आशिर्वाद यात्रे दरम्यान शिवसेनेवर टीका केली जात आहे. तसेच एकनाथ शिंदेंबद्दल राणेंनी केलेलया विधानामुळे शिवसेनेतील नेत्यांमध्ये अस्वस्थता पसरली आहे. यावरून शिवसेना नेते गुलाबराव पाटील यांनी राणेंवर हल्लाबोल केला. मंत्री राणेंना “सूक्ष्म उद्योग खाते मिळाले आहे, त्यामुळे त्यांचे डोकेही सूक्ष्म झाले आहे. त्यामुळे ते एकनाथ शिंदे शिवसेनेवर नाराज असल्याचे म्हणत आहेत, अशी टीका मंत्री पाटील यांनी केली.

शिवसेना नेते गुलाबराव पाटील यांनी आज माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी भाजपनेते तथा मंत्री नारायन राणे यांच्यावर टीकास्त्र डागले. यावेळी टीका करताना पाटील म्हणाले की, शिवसेनेतून आपले अस्तीत्व निर्माण करणारे व भाजपवासी झालेले केंद्रीयमंत्री नारायण राणे पहिले किती दिवस अस्वस्थ होते हे आपण पाहिले आहे, त्यामुळे त्यांचा अस्वस्थपणा जण आशिर्वाद यात्रेच्या माध्यमातून बाहेर निघाला आहे.

मंत्री राणेंच्या शिवसेना, काँग्रेस पक्षातील वाटचालीबद्दलही गुलाबराव पाटलांनी माहिती दिली. मंत्री राणे पहिले शिवसेनेत अस्वस्थ होते, त्यानंतर ते काँग्रेसमध्ये अस्वस्थ झाले. आता भाजपमध्ये गेल्यानंतर त्यांना सूक्ष्म लघु उद्योग खाते मिळाले आहे. त्यामुळे त्यांचे डोकेही सूक्ष्म झाले आहे”