भावना गवळींना चिकनगुनियाची लागण, ईडीच्या समोर चौकशीसाठी हजर राहणार नाहीत

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । गेल्या काही महिन्यांपासून ईडीच्या रडारवर असलेल्या यवतमाळ – वाशिमच्या शिवसेनेच्या खासदार भावना गवळी यांना दुसरे समन्स पाठविण्यात आले. बेलार्ड पियार्ड येथील कार्यालयात आज सकाळी 11 वाजता हजर राहण्याची सूचना करण्यात आली आहे. मात्र, भावना गवळी या चौकशीसाठी हजर राहणार नसून त्यांना चिकनगुनियाची लागण झाल्याची माहिती गवळी यांचे वकील इंद्रपाल सिंग यांनी ही माहिती दिली आहे.

शिवसेनेच्या खासदार भावना गवळी यांना चिकनगुनियाची लागण झाली असल्याने त्यांनी चौकशीसाठी हजर राहण्यासाठी ईडीकडे 15 दिवसांची मुदत मागितली आहे. ईडीने ट्रस्टमधील गैरव्यवहार प्रकरणी अन्य पुरावे व जबाब मिळविण्यावर भर दिला आहे. महिला प्रतिष्ठान या ट्रस्टचे कंपनीमध्ये रुपांतर केल्याप्रकरणी, तसेच शेल कंपन्यांद्वारे कोट्यवधीच्या देणग्या कंपनीच्या खात्यावर वर्ग केल्याचा आरोप त्यांच्यावर आहे.

भावना गवळी यांच्याकडून ईडीला प्रकृतीच्या अस्वस्थाबाबतचं पत्रं देण्यात येणार असून मेडिकल सर्टिफिकेटही देण्यात येणार आहे. श्री बालाजी पार्टीकल बोर्ड नावाने भावना गवळी यांच्या कारखान्यासाठी राष्ट्रीय सहकार महामंडळाने 29 कोटी रुपयांचे तर राज्य शासनाने 14 कोटी रुपयांचे अनुदान दिले होते. मात्र, 43 कोटी रुपयांचे अनुदान घेऊनही गवळी यांनी कारखाना सुरू केला नाही. उलट 7 कोटी रुपये मूल्य दाखवून हा कारखाना भावना गवळी यांच्याच दुसऱ्या एका संस्थेला विकण्यात आला. याच घोटाळा प्रकरणी गवळींची ईडीकडून चौकशी करण्यात येत आहे.

Leave a Comment