हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । शिवसेनेचं मुखपत्र दैनिक ‘सामना’च्या आजच्या अग्रलेखात दिल्ली हिंसाचारावर भाष्य करण्यात आलं आहे. शिवसेनेने आपल्या अग्रलेखात ७ मुद्द्यांवर केंद्रातील भाजप सरकारला धारेवर धरलं आहे. सामानाच्या अग्रलेखातून सरकारच्या शांतता आणि सुव्यवस्था राखण्याच्या कार्यशैलीवर ताशेरे ओढले आहेत.
सामनाच्या अग्रलेखातील ७ महत्वाचे मुद्दे
१)दिल्ली जळत असताना गृहमंत्री कोठे होते? हिंसाचाराच्या वेळी निम्मे मंत्रिमंडळ अहमदाबादमध्ये होते.
२)देशातील विरोधी पक्ष हतबल झाला आहे. नाहीतर दिल्लीतील ३८ बळी सरकारच्या मानगुटीवर बसवून जाब विचारता आला असता. ३८ बळी गेले की जाऊ दिले? तेही प्रे. ट्रम्प यांच्या साक्षीने.
३) हिंसाचार झाल्याच्या ३ दिवसानंतर एनएसए अजित डोभाल लोकांमध्ये गेले. त्यानं काय होईल? जे नुकसान व्हायचे होते ते आधीच झाले होते.
४) देशाला एक मजबूत गृहमंत्री मिळाला आहे, परंतु तसं काही जाणवलंच नाही. विरोधकांनी यावर प्रश्न उपस्थित केल्यास त्यांना तुम्ही गद्दार घोषित करणार काय?
५) दिल्ली हिंसाचारा संदर्भातील याचिकेवर सुनावणी करणारे न्यायमूर्ती मुरलीधर यांच्या बदलीचा आदेश २४ तासात काढण्यात आला. ‘न्यायालयासही सत्य बोलण्याची शिक्षा मिळू लागली आहे काय? न्यायमूर्ती मुरलीधर यांनी चुकीचे काय सांगितले?,’ न्यायमूर्ती मुरलीधर यांच्या बदलीतून ‘सरकारनं न्यायालयानं व्यक्त केलेलं ‘सत्य’ मारलं आहे’.
६)शाहीन बागचे प्रकरणही सरकारला संपवता आले नाही. तेथे सर्वोच्च न्यायालयाने नेमलेले मध्यस्थ सुद्धा अपयशी ठरले. अशा परिस्थितीत मात्र, चिथावणीखोर भाषण ही राजकारणातील गुंतवणूक बनली आहे.
७)अर्थव्यवस्था विस्कळीत झाली आहे परंतु चिथावणीखोर विधानांचा बाजार तेजीत आहे.
दिवसभरातील ताज्या बातम्या तुमच्या मोबाईलवर मोफत मिळवण्यासाठी ”Hello News” टाईप करून 8080944419 या नंबरवर Whatsapp करा.