शिवसेनेचे बंडखोर आ. शंभूराज देसाई कोरोना पॉझिटिव्ह

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी

पाटण तालुक्याचे विद्यमान व शिवसेना बंडखोर आमदार, माजी गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांची कोरोना टेस्ट पॉझिटिव्ह आली आहे. याबाबतची माहिती स्वतः शंभूराज देसाई यांच्या कार्यालयातून देण्यात आली आहे. शिंदे गटाचे आ. शंभूराज देसाई हे सध्या मुंबईत आहेत. तसेच काळजीचे कारण नसल्याचे सांगण्यात आले आहे.

आ. शंभूराज देसाई हे वर्षा या शासकीय निवासस्थानी सध्या गृह विलगीकरण कक्षात असल्याचे सांगितले आहे. कोरोना टेस्ट पॉझिटिव्ह आले असली, तरी कोणतेही घाबरण्याचे कारण नाही. तसेच डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार चार ते पाच दिवस विश्रांती घेण्यात येणार असल्याचे पत्राद्वारे कळविण्यात आले आहे. शिवसेनेतील सध्या सुरू असलेल्या बंडखोर नाट्यात शंभूराज देसाई हे आघाडीवर असल्याचे पाहायला मिळाले होते.

सुरत, गुवाहाटी, गोवा पुन्हा मुंबई आणि त्यानंतर पाटण मतदार संघात शिंदे गटाची व आपली भूमिका मांडल्यानंतर शंभूराज देसाई हे मुंबईत दाखल झाले होते. गेल्या पंधरा ते वीस दिवसापासून सतत प्रवास तसेच बंडखोरी नाट्यामुळे मोठी धावपळ झाली होती. आज तपासणी केली असता, कोरोना टेस्ट पॉझिटिव्ह आल्याचे सांगण्यात आले.

Leave a Comment