वर्धा प्रतिनिधी
नरेंद्र मोदी यांची आज वर्धा या ठिकाणी प्रचारसभा संपन्न झाली. या सभेची गर्दी पाहता ही सभा जवळजवळ फेल गेल्याची चर्चा शहरात आहे. कारण सभेच्या मंडपात ५० हजार खुर्च्या लावल्या होत्या त्यापैकी अर्ध्यापेक्षा जास्त खुर्च्या या मोकळ्या होत्या. कडक उन्हामुळे अधिक माणसांनी सभेकडे पाठ फिरवली असल्याची जिल्ह्यात चर्चा आहे.
मोदींच्या प्रचारसभेत कोणत्याही होर्डिंग्ज वर धनुष्यबाण नाही.
त्यामुळे शिवसैनिक काहीसे अस्वस्थ झाल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. हा मुद्दा आता श्रेयवादातीत मुद्दा बनला आहे. शहरात ठिकठिकाणी मोठ्या प्रमाणात होर्डिंग्ज लावण्यात आली होती. यामध्ये उद्धव ठाकरे आणि शिवसेने नेते यांच्या फोटोलगत धनुष्यबाण नाही आणि बाळासाहेब ठाकरेंचा फोटो देखील नव्हता
त्यामुळे जिल्ह्यातील शिवसैनिकांमध्ये अस्वस्थता पसरली आहे. लोकसभा निवडणुकीत श्रेयवादाचं नाट्य गेली ४ वर्ष भाजप सेनेमध्ये पाहायला मिळालं. आता पुन्हा एकदा बाळासाहेब आणि शिवसेनेचं चिन्ह गायब झाल्याने ही सभा युतीची आहे की फक्त भाजपची असा प्रश्न पडत आहे.