हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | पिंपरी चिंचवड महापालिका निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना खासदार संजय राऊत यांनी शिवसेना कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन केले. दरम्यान यावेळी काहीही करून महापौर आपलाच करायचा असे संजय राऊत यांनी म्हंटल. पिंपरी-चिंचवड महानगर पालिकेच्या ४०- ४५ जागा जिंकलो की शंभर टक्के महापौर आपलाच असेही ते म्हणाले.
संघटना मजबूत करा, कार्यकर्त्यांना ताकद द्या, एकत्र राहा. एकमेकांचा द्वेष करू नका. एकाच पक्षाचे आपण आहोत. एका झेंड्या खाली काम करतोय. जस आम्ही म्हणालो, मुख्यमंत्री आमचाच. झाला की नाही… झालाच, पहिल्या दिवसापासून कोणाला माहीतीय ५५- ५४ चा मुख्यमंत्री होईल तरीही आपला मुख्यमंत्री झाला अशी आठवणही राऊतांनी करून दिली.
भाजपने भय आणि भ्रष्टाचार मुक्त पिंपरी-चिंचवड अशा घोषणा पाच वर्षापूर्वी दिल्या होत्या. पण, या पाच वर्षात भय आणि भ्रष्टाचाराचा अंत झाला नाही अशा शब्दांत संजय राऊतांनी भाजपवर टीका केली. आघाडीबाबत बोलताना, ते योग्य वेळी ठरवू, सन्मानाने जागा वाटप झाले तर आम्ही आघाडीचा विचार करू, आघाडी होणार नाही असे आम्ही म्हणत नाही, असे त्यांनी स्पष्ट केले.