कराड प्रतिनिधी सकलेन मुलाणी
सातारा जिल्ह्यातील वजनदार शिवसेनेचे नेते व पाटण विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार आणि राज्याचे गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांचा मोबाईल नाॅट रिचेबल लागत आहे. त्यामुळे आता आ. शंभूराज देसाई नक्की कोठे आहेत याबाबत राजकीय चर्चांना उधाण आले आहे. मुंबई, गुजरात कि मतदार संघात आहेत, असा प्रश्न उपस्थित केला जावू लागला आहे. तसेच दुपारी होणाऱ्या पक्षाच्या बैठकीला मुंबईत उपस्थित राहणार का?
आ. शंभूराज देसाई हे गेल्या अनेक वर्षापासून शिवसेनेशी एकनिष्ठ आहेत. मात्र, त्यांची मैत्री ही देवेंद्र फडणवीस यांच्याशी आहे. अशावेळी एकनाथ शिंदे नाराज असून ते गुजरातमध्ये आहेत. त्याच्यासोबत अनेक आमदार सोबत आहेत. अशावेळी आ. शंभूराज देसाई यांचा फोन नाॅटरिचेबल आहे. त्यामुळे नक्की आ. देसाई गुजरातमध्ये आहेत की मुंबईत यांची स्पष्टता दुपारपर्यंत समोर येईल. मात्र, जास्तीची शक्यता ही राजकीय जाणकरांच्या मते आ. देसाई एकनाथ शिंदे यांच्यासोबत असल्याचे म्हटले जात आहे.
आ. शंभूराज देसाई यांच्या नाॅटरिचबेलमुळे सातारा जिल्ह्यात मोठ्या राजकीय चर्चांना उधाण आले आहे. गेल्या काही दिवसात पाटण येथे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांचे येणे- जाणे मोठ्या प्रमाणावर झाले आहे. तर सातारा जिल्ह्यात अनेकदा मंत्री शिंदे आणि मंत्री देसाई हे पहायला मिळत आले आहे. त्यामुळे नक्की आ. देसाई मोबाईल नाॅटरिचेबल करून कुठे आहेत, यांची स्पष्टता आज दुपारी मातोश्री येथील बैठकीसमयी समजेल.