कर्नाटकात सोने चोरी करणाऱ्या मध्य प्रदेशातील टोळीला धुळे पोलिसांकडून अटक

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

धुळे : हॅलो महाराष्ट्र – कर्नाटक येथे सोने चोरी (Theft) करणाऱ्या मध्यप्रदेश राज्यातील टोळीला धुळे पोलिसांकडून अटक करण्यात आली आहे. यामध्ये चार आरोपींना अटक करण्यात आली आहे. त्यांच्याकडून ब्रीजा गाडीमध्ये लपवून ठेवलेले 18 लाख रुपये किमतीचे सोन्याचे दागिने जप्त करण्यात आले आहे. पुढील कारवाईसाठी या आरोपींना कर्नाटक पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे. मुंबईहून मंगलोरला जाणाऱ्या खासगी बसमधून 18 लाख रुपये किंमतीचे हे सोन्याचे दागिने चोरी (Theft) करण्यात आले होते. याप्रकरणी कर्नाटकातील कुंदापुरा तालुक्यातील बाइंदुर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.

अमजद खान हुसेन खान, अली खान हुसेन खान, इकरार खान मुखतार खान, गोपाल पप्पू अमलवार अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. हे चौघेही मध्य प्रदेश येथील रहिवाशी आहेत. या आरोपींकडे (Theft) गुन्ह्याबाबत विचारपूस केली असता सुरवातीला त्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली. मात्र त्यांना स्थानिक गुन्हे शाखेत आणून विचारपूस केली असता त्यांनी आपला गुन्हा मान्य केला आहे. यानंतर आरोपींनी ब्रीझा गाडीमध्ये लपवून ठेवलेले 18 लाख रुपये किंमतीचे सोन्याचे दागिने पोलिसांच्या स्वाधीन केले. त्यानंतर या आरोपींना पुढील कारवाईकरीता कर्नाटक पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.

सापळा रचून आरोपींना अटक
स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक हेमंत पाटील यांना एक मारुती ब्रीझा कार औरंगाबादकडून धुळे मार्गे मध्यप्रदेश राज्यात जाणार असल्याची माहिती मिळाली होती. तसेच आरोपीच्या शोधासाठी कर्नाटक येथील पथक देखील धुळे येथे हजर झाले होते. त्याअनुषंगाने पोलीस निरीक्षक हेमंत पाटील यांच्या आदेशाने स्थानिक गुन्हे शाखा, सोनगीर पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक चंद्रकांत पाटील व पथक तसेच कर्नाटक पोलीस यांनी सोनगीर टोल नाका येथे आरोपींची सापळा रचला. यानंतर मारुती ब्रीझा कार धुळ्याकडून सोनगीर टोल नाक्यावर येताच पोलिसांनी या गाडीस अडवण्याचा प्रयत्न केला मात्र ब्रीझा गाडीच्या चालकाने पोलिसांच्या खाजगी वाहनाला धडक देऊन पळून जाण्याचा प्रयत्न केला. या ब्रीझा गाडीतून पोलिसांनी चार आरोपींना (Theft) अटक केली आहे.

हे पण वाचा :
धारावीच्या वरिष्ठ पोलिसांनी टाळ मृदुंगाच्या गजरात वारकऱ्यांसोबत धरला ठेका

आम्हाला धोका असेल तर समोरच्यांनाही नाही का?; विधानपरिषद निवडणुकीवरून संजय राऊतांची प्रतिक्रिया

भाजपचे अनेक आमदार माझ्या संपर्कात, पण … ; खडसेंचं मोठं विधान

मुख्यमंत्री पद वाचविण्यासाठी बळी जाणार मिशीवाल्या मावळ्याचा; भाजप नेत्याचे सूचक ट्विट

महिलेला जातीवाचक शिवीगाळ केल्यामुळे करुणा शर्मावर गुन्हा दाखल

Leave a Comment