शिवाजी विद्यापीठाच्या फेन्सींग संघाला खेलो इंडीया विद्यापीठ स्पर्धेत घवघवीत यश

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

कोल्हापूर प्रतिनिधी । सतेज औंधकर
शिवाजी विद्यापीठाच्या फेन्सींग खेळाडूंमध्ये आंतरराष्ट्रीय पातळीवर नावलौकिक करण्याची पूर्ण क्षमता आहे. या खेळाडूंनी खेलो इंडिया स्पर्धेतील पहिले पदक प्राप्त करून दैदिप्यमान यश प्राप्त केले आहेत, असे गौरोवोद्गार कुलगुरू डॉ.देवानंद शिंदे यांनी काढले.

भूवनेश्वर (ओरिसा) येथे झालेल्या पहिल्या खेलो इंडिया अंतरविद्यापीठ स्पर्धेमध्ये शिवाजी विद्यापीठाच्या फेन्सींग संघाने तृतीय क्रमांकांचे विजेतेपद पटकावले. या संघातील खेळाडूंनी आज कुलगुरू डॉ.देवानंद शिंदे यांची सदिच्छा भेट घेतली. त्यावेळी डॉ.शिंदे यांनी गौरोवोद्गार काढले. यावेळी क्रीडा अधिविभागप्रमुख डॉ.पी.टी.गायकवाड, डॉ.अनिल कुराडे उपस्थित होते. प्र-कुलगुरू डॉ.डी.टी.शिर्के, कुलसचिव डॉ.विलास नांदवडेकर यांचे खेळाडूंना प्रोत्साहन लाभले. प्रशिक्षक डॉ.राहूल मगदूम, संघ व्यवस्थापक डॉ.महेश पाटील यांनी खेळाडूंना मार्गदर्शन केले.

सांघिक गटातील सर्वसामान्य तृतीय क्रमांकाचे विजेतेपद पटकावलेले यशस्वी खेळाडू – अदित्य अनघळ (सेबर वैयक्तीक सुवर्णपदक, सेबर टिम इव्हेंट रौप्यपदक), विपुल येडेकर (फॉइल वैयक्तीक कास्यपदक, फॉइल टिम इव्हेंट कास्यपदक), प्रथमकुमार शिंदे (इप्पी टिम इव्हेंट रौप्यपदक, फॉइल टिम इव्हेंट कास्यपदक), धनंजय जाधव (सेबर टिम इव्हेंट रौप्यपदक), गिरिष जकाते (इप्पी टिम इव्हेंट रौप्यपदक, फॉइल टिम इव्हेंट कास्यपदक), प्रतिक जाधव (सेबर टिम इव्हेंट रौप्यपदक), श्रेयस तांबवेकर (इप्पी टिम व फॉइल टिम रौप्य व कास्यपदक), मोरेश्वर पाटील (इप्पी टिम इव्हेंट रौप्यपदक), गजराज डोके (इप्पी टिम इव्हेंट रौप्यपदक), प्रसाद सनस (सेबर टिम इव्हेंट रौप्यपदक).

ताज्या बातम्या तुमच्या मोबाईलवर मोफत मिळवण्यासाठी ”Hello News” टाईप करून 8080944419 या नंबरवर Whatsapp करा.

Leave a Comment