कोल्हापूर प्रतिनिधी । सतेज औंधकर
शिवाजी विद्यापीठाच्या तंत्रज्ञान अधिविभामध्ये “TECHNOSIS 2020” या राज्यस्तरीय स्पर्धेचे रसायन अभियांत्रिकी शाखेमध्ये आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेच्या उदघाट्नासाठी शिवाजी विद्यापीठाचे प्र-कुलगुरू प्रा.डॉ.डी.टी. शिर्के, तंत्रज्ञान आणि अभियांत्रिकी शाखेचे अधिष्ठाता प्रा.डॉ.पी.एस. पाटील हे प्रमुख आतिथी म्हणुन उपस्थित होते. आणि कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान तंत्रज्ञान अधिविभागाचे संचालक डॉ. जयदीप. एस.बागी यांनी भुषविले होते. प्रा.डॉ.पी.एस.पाटील यांनी विद्यार्थ्यांना आपले स्वत:चे स्थान निर्माण करण्यासाठी कशाप्रकारे करता येईल हे काही उदाहरणांचा दाखला देत विशद केले.
प्रा.डॉ.डी.टी.शिर्के यांनी आपले मनोगत व्यक्त करतांना स्पष्ट केले की, संशोधनाची सुरूवात ही एखादी समस्या व तिचे निराकरण कसे करावे? तसेच शिक्षण ही एक निरंतर प्रक्रिया असुन जिज्ञासा हे त्याचे मूळ होय. त्याचबरोबर आंतरशाखीय संशोधन ही काळाची गरज आहे. या संकल्पना त्यांनी आपल्या विचारांतुन विद्यार्थ्यांसमोर व्यक्त केल्या.
डॉ. जयदीप.एस. बागी यांनी आपल्या भाषणांत विद्यार्थ्यांचे एकुण जडण-घडण होण्यासाठी अशा स्पर्धात्मक कार्यक्रमांची गरज आहे आणि अधिविभागामध्ये असे कार्यक्रम वेळो-वेळी वेगवेगळया माध्यमातुन घेतले जातात असे नमुद केले. कार्यक्रमाची सुरूवात विज्ञान व तंत्रज्ञान तसेच सामाजिक कार्यात महिलांचे योगदान यावरील चलचित्रफीती दाखवून करण्यात आली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक श्रीपाल एम. गायकवाड यांनी केले. त्यांनी आपल्या प्रस्ताविकेत या स्पर्धेकरीता विविध महाविद्यालयाच्या 200 हून अधिक विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता अशी माहिती दिली.
या स्पर्धेत Innovative startup Ideas (ISI), Solution for Industrial Problem(SIP), Interview Skill Test(ISI), Quiz- Competition याचबरोबर Chem Race आणि Starch Walk या मनोरंजनात्मक स्पर्धोचेदेखील आयोजन करण्यात आले होत. कार्यक्रमाच्या समारोपासाठी सुरेश जोशी, उपसंचालक औदयागिक सुरक्षा आणि आरोग्या महाराष्ट्र शासन हे उपस्थित होते. त्यांनी नोकरी देणारे नव उदयोजक घडावेत असे आव्हान केले तसेच विद्यार्थ्यांनी पुस्तके वाचण्याची सवय अंगी बाळगावी असे मत व्यक्त केले. कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन डॉ. पी.डी. पाटील यांनी केले.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेकरिता तपोजा दिवाण, डॉ. डी. एम. नांगरे, पी.पी.पाटील, सौ. वैशाली मोहीते, शितल देहनकर, प्रियंका पाटील, मोहीनी साबळे, ए.बी. मडावी आणि द्वितीय, तृतीय व अंतिम वर्षाच्या विद्यार्थ्यांनी अथक परिश्रम घेतले. या कार्यक्रमाकरिता कुलगुरू प्रा.डॉ. देवानंद शिंदे आणि कुलसचिव प्रा.डॉ. विलास नांदवडेकर यांचे मार्गदर्शन लाभले.
दिवसभरातील ताज्या बातम्या तुमच्या मोबाईलवर मोफत मिळवण्यासाठी ”Hello News” टाईप करून 8080944419 या नंबरवर Whatsapp करा.