Shivalik Sharma Arrested : मुंबई इंडियन्सच्या माजी खेळाडूला अटक; बलात्काराचा आरोप

Shivalik Sharma Arrested
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । मुंबई इंडियन्सचा माजी खेळाडू शिवलिक शर्माला अखेर अटक (Shivalik Sharma Arrested) करण्यात आली आहे. शिवलिक शर्मावर एका तरुणीकडून फसवणूक आणि अत्याचाराचा आरोप करण्यात आला होता.. तेव्हापासून पोलीस त्याच्या मागावर होते अखेर जोधपूर पोलिसांनी शिवालिकला बडोद्यातून ताब्यात घेतलं आहे.. तसेच त्याला न्यायालयात हजर करण्यात आलं असता कोर्टाने त्याला न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. नेमक प्रकरण आहे तरी काय? ते जाणून घेऊयात…..

शिवलिकने लग्नाचे आमिष दाखवून बलात्कार आणि लैंगिक शोषण केल्याचा आरोप जोधपूरमधील एका मुलीने केला आहे. याबाबत पोलीस स्टेशन मध्ये एफआयआर सुद्धा दाखल करण्यात आला होता. सदर मुलीचा आरोप आहे की ती फेब्रुवारी २०२३ मध्ये तिच्या मैत्रिणींसोबत वडोदरा येथे गेली होती, त्याठिकाणी तिची शिवालिक शर्माशी भेट झाली. मग दोघेही मोबाईलवर बोलू लागले. दोघेही एकमेकांच्या आणखी जवळ येऊ लागले. ऑगस्ट २०२३ मध्ये, शिवालिक आणि त्याचे कुटुंब जोधपूरला आले आणि कुटुंबातील सदस्यांशी बोलल्यानंतर, शिवालिक आणि मुलीचे लग्न ठरले. दोघांनी जोधपूरमध्ये त्यांच्या कुटुंबियांच्या उपस्थितीत साखरपुडा सुद्धा केला.

लग्नाचे खोटे आश्वासन देऊन बलात्कार – Shivalik Sharma Arrested-

त्यानंतर गेल्या वर्षी २७ मे रोजी शिवालिक मुलीच्या घरी गेला. त्यावेळी घरात कोणीही नव्हते. मुलीने नकार देऊनही, शिवालिकने तिला लग्नाचे खोटे आश्वासन देऊन तिच्यावर बलात्कार केला. यानंतर तिच्यासोबत अनेक वेळा वाईट कृत्ये करण्यात आली. शिवालिक मुलीला मेहंदीपूर बालाजी, जयपूर आणि उज्जैन येथे घेऊन गेल्याचा आरोप आहे. गेल्या वर्षी जूनमध्ये शिवलिकने लग्नाबद्दल बोलण्यासाठी मुलीला वडोदरा येथे बोलावले होते. जेव्हा मुलगी वडोदराला गेली तेव्हा शिवालिकच्या पालकांनी तिला अनेक वेळा फटकारले. तसेच साखरपुडा मोडल्याबद्दल माहिती दिली. मुलीच्या कुटुंबालाही फोनवरून याची माहिती देण्यात आली. एवढेच नाही तर मुलीला घराबाहेर हाकलून लावण्यात आले. यानंतर ती मुलगी जोधपूरला आली. मुलीने शिवालिकला समजावण्याचा प्रयत्न केला, पण त्याने ऐकले नाही आणि तिला धमकावू लागला. यानंतर पीडितेने जोधपूरच्या कुडी भगतसुनी गृहनिर्माण मंडळ पोलिस ठाण्यात शिवालिक शर्माविरुद्ध गुन्हा दाखल केला होता .. त्यानंतर आज त्याला बडोद्यातून अटक करण्यात आली. (Shivalik Sharma Arrested)

शिवलिक शर्मा हा मुंबई इंडियन्स क्रिकेट संघाचा भाग राहिला आहे. आयपीएल २०२४ दरम्यान त्याला मुंबई इंडियन्समध्ये २० लाख रुपयांना खरेदी केले होते. तो बडोदा संघात हार्दिक पंड्या आणि कृणाल पंड्यासोबतही खेळला आहे. शिवलिक शर्माने बडोद्यासाठी भारतीय क्रिकेटमध्ये ५० हून अधिक सामने खेळले आहेत. परंतु आयपीएल मध्ये त्याला अंतिम ११ मध्ये कधीही संधी मिळाली नाही.