हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Shivbhojan Thali – 2020 मध्ये उद्धव ठाकरे सरकारने गोर गरिबांना कमी दरात पोषक जेवण मिळावे यासाठी ‘शिवभोजन’ योजना सुरु केली. पण आता गरजू लोकांची हीच थाळी बंद होण्याच्या चर्चा सगळीकडे रंगत आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंत्रिमंडळ बैठकीत योजनेचा आढावा घेण्याच्या सूचना दिल्या आहेत, ज्यामुळे या योजनेला पुढे चालवण्याबाबत अनिश्चितता निर्माण झाली आहे. त्यामुळे यंदा हि गरजू लोकांची योजना बंद होणार कि काय यावर अनेक प्रश्न उपस्थित होताना दिसतायत . तर चला याबदल अधिक माहिती जाणून घेऊयात.
राज्यभरात ‘शिवभोजन’ ची 1904 केंद्रे (Shivbhojan Thali) –
या योजनेचा मुख्य उद्देश सर्व स्तरातील गरीब आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल व्यक्तींना सुलभ, सुसंगत, आणि पोषणयुक्त आहार पुरवणे आहे. या योजनेअंतर्गत, राज्यभरातील विविध ठिकाणी, विशेषत: शहरी आणि ग्रामीण भागांमध्ये, शिवभोजन केंद्र उघडण्यात आले आहेत. राज्यभरात ‘शिवभोजन’ ची 1904 केंद्रे कार्यरत आहेत. येथील जेवणाचे दरही सर्वसामान्यांना परवडण्याजोगे असते.
फक्त 10 रुपयांना मिळणारी भोजन थाळी –
हि थाळी (Shivbhojan Thali)लोकांना फक्त 10 रुपयांना दिली जाते. बाकीची रक्कम राज्य सरकार अनुदानाद्वारे भरपाई करत असते . या दहा रुपयांच्या थाळीत नागरिकांना दोन चपात्या, एक वाटी भाजी, एक वाटी डाळ आणि एक वाटी भात इत्यादी पदार्थांचा समावेश असतो. तसेच हि योजना सरकार कंत्राटदारांमार्फत राबवत आहे .
यंदा योजना बंद होणार ? –
चालू आर्थिक वर्षासाठी 220 कोटी रुपयांची तरतूद या योजनेसाठी करण्यात आली आहे. पण येत्या आर्थिक वर्षात या योजनेसाठी आर्थिक तरतूद केली नाही तर हि योजना बंद होण्याची शक्यता वर्तवली जात आहे . या निर्णयावर प्रतिक्रिया देताना, राज्याचे माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडे पत्र पाठवून योजनेला पुढे सुरू ठेवण्याची मागणी केली आहे.