व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
Take a fresh look at your lifestyle.

फुकटचे सल्ले द्यायला ते कधी साताऱ्यात असतात का?; शिवेंद्रराजे भोसले यांची उदयनराजेंवर टीका

सातारा प्रतिनिधी । शुभम बोडके

साताऱ्यातील दोन राजांकडून एकमेकांवरील केल्या जाणाऱ्या टीका काही केल्या कमी होताना दिसत नाही. आज साताऱ्याचे आमदार शिवेंद्रराजे भोसले यांनी पुन्हा एकदा खासदार उदयनराजे यांच्यावर टीका केली आहे. “उदयनराजेंना फुकटचे सल्ले द्यायला ते कधी साताऱ्यात असतात का? महिन्यातून एकदा साताऱ्यात यायचं. पेपर बाजी करायची आणि गायब व्हायचं, असा टोला शिवेंद्रराजेंनी लगावला.

शिवेंद्रसिहराजे यांनी आज साताऱ्यात माध्यमांशी संवाद साधला. यावेळी ते म्हणाले की, प्रत्येकवेळी निवडणुका लागल्यावर साताऱ्यात यायचं. मात्र, पाच वर्ष कामाच्या नावानं बोंबाबोंब. वास्तविक त्यांचा नगरपालिकेच्या कामावर कुठेही कंट्रोल राहिलेला नाही.

सातारा नगरपालिकेतून फक्त बिल काढायची आणि कमिशन खायची एवढंच काम उदयनराजे भोसले यांच्याकडून केली जात आहे, अशी टीका शिवेंद्रराजे भोसले यांनी केली. आता त्याच्या टीकेला उदयनराजे नेमकं काय उत्तर देणार हे पहावे लागणार आहे.