व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
Take a fresh look at your lifestyle.

नवले ब्रिज अपघात : टँकरचे ब्रेक फेल नव्हतेच; अपघाताचे नेमकं कारण समोर

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । पुण्यातील नवले पूलावर रविवारी रात्री भीषण अपघात झाला. एका भरधाव टँकर एकदोन नाही तर तब्बल 48 पेक्षा अधिक वाहनांना धडक दिल्याने खळबळ उडाली. टँकरचा ब्रेक फेल झाल्याने अपघात झाल्याचं बोललं जात होतं. मात्र तपासादरम्यान मात्र वेगळंच कारण समोर आलं आहे. गाडीचे ब्रेक फेल नव्हतेच मात्र केवळ चालकाच्या मस्तीमुळे हा अपघात झाल्याचे समोर आलं आहे.

चालकाने उतार असल्याने इंजिन बंद केलं होतं आणि गेअर न्यूट्रल करत ट्रक चालवत होता. त्यामुळे ती कंट्रोल होऊ शकली नाही. कंटेनरने तब्बल 48 गाड्यांना धडक दिली आणि हा भीषण अपघात घडला . या अपघातानंतर चालक मणिराम छोटेलाल यादव हा अपघात स्थळावरून फरार झाला असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत.

दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली. यावेळी रस्त्याची रचना, महापालिकेकडून फूटपाथ, सर्व्हिस रोड योग्य पद्धतीने बांधण्यात यावे, अशी मागणी त्यांनी महापालिकेकडे केली आहे. तसेच सातत्याने अपघात होत असेल तर त्यावर उपाययोजना करुन अपघाताची संख्या शून्यावर कशी येईल याकडे लक्ष देणं गरजेचं आहे, असंही सुप्रिया सुळे म्हणाल्या.