सातारा प्रतिनिधी । शुभम बोडके
लोकांची कामे केली म्हणूनच मी आमदारकीला निवडून आलो. परंतु लोकांचे प्रेम असून देखील खासदारकीला उदयनराजे भोसले पडले. त्यामुळे त्यांनी आत्मचिंतन करावे आणि पेटिंग काढण्यापेक्षा लोकांची कामे करावीत, असा टोला भाजप आमदार शिवेंद्रराजे भोसले यांनी लगावला.
शिवेंद्रराजे भोसले यांनी आज सातारा येथे माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी खा. उदयनराजे भोसले यांच्या पेंटींगच्या प्रकारावरून पुन्हा निशाणा साधला. यावेळी ते म्हणाले कि, खरं पाहिलं तर शहरात अथवा आपल्या असलेल्या मतदार संघात वाद – विवाद घडू नये, येथील वातावरण कोणत्याही कारणांनी तापू नये जेणेकरून प्रशासनावर दबाव निर्माण होईल. हे पाहण्याचे काम लोकप्रतिनिधींचे असते. शहर तणावमुक्त आणि सर्वचबाबतीत चांगले राहावे यासाठी लोकप्रतिनिधींनी लक्ष देणे आवश्यक असते. मात्र, शहरात जर तणाव निर्माण झाल्यास त्याला लोकप्रतिनिधी जबाबदार असतात.
आपण कुणाला वेड्यात काढत आहे हे सर्वांना समजते. जनतेलाही ते दिसत असते. माझ्याबाबत सांगितले गेले कि, तुम्हीही लोकांची कामे करा म्हणजे तुमचेही पेंटिंग काढले जाईल. मात्र, मला काही केल्या पेंटिंग काढून घ्यायची हौस नाही. मी लोकांची आणि येथील मतदार संघातील कामे केली म्हणूनच विधानसभेत निवडून आलो आहे. आणि काहींना पराभव पत्करावा लागला. काहीजण लोकांचं एवढं प्रेम असून देखील निवडणुकीत पडले. खरं तर हा आत्मचिंतनाचा विषय आहे. ते आत्मचिंतन त्यांनी करावे. पेंटिंग काढण्यापेक्षा कामाच्या माध्यमातून आपले नाव झाले पाहिजे. संबंधित पेंटिक त्रयस्थ लोकांनी काढले असते तर आम्ही समजून घेतले असते. मात्र, माझ्याच गाडीत मागे बसणाऱ्यांनी माझंच पेंटिंग काढायचे, या गोष्टीला काय अर्थ आहे.
https://www.facebook.com/watch/?v=1165674780810066
कुठेतरी नगरपालिकेच्या निवडणुका नजरेसमोर ठेऊन मी चार पेंटींग काढले कि मला उमेदवारी मिळेल असा गोष्टी केल्या जात आहेत. त्यापेक्ष अशी लोक असण्यापेक्षा नसलेली बरी. मी माझेच पेंटिंग काढायला लावायचे आणि जनतेचं माझ्यावर खूप प्रेम आहे हे दाखवायचे हा म्हणजे झोपलेला आहे असे दाखवायचे झोपेचे सोंग घ्यायचे असे दाखवण्यासारखे झाले त्यातील हा सर्व प्रकार असल्याचा टोला शिवेंद्रराजे भोसले यांनी उदयनराजे भोसले यांना लगावला आहे.