भाजपाकडून शिवराज पाटील यांचा निषेध, जोडे मारो आंदोलन

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सातारा प्रतिनिधी | शुभम बोडके
काँग्रेसचे नेते, माजी गृहमंत्री, माजी राज्यपाल शिवराज पाटील- चाकूरकर यांनी भगवतगीतेचा दाखला देताना अत्यंत सडक्या मेंदूचे आणि काँग्रेसच्या सडक्या विचारधारेचे प्रदर्शन करत अपशब्द वापरले. त्याबद्दल भाजपा सातारा शहराध्यक्ष विकास गोसावी आणि सातारा ग्रामीणचे अध्यक्ष राजेंद्र इंगळे यांच्या नेतृत्वाखाली पोवई नाका सातारा येथे निषेध आंदोलन करण्यात आले. तसेच शिवराज पाटील यांच्या फोटोला जोडे मारण्यात आले.

माजी राज्यपाल शिवराज पाटील- चाकूरकर यांनी जाहीर सभेमध्ये श्रीकृष्ण, अर्जुन आणि भगवतगीता या बद्दल अपशब्द वापरून हिंदू धर्माबद्दल अपप्रचार करण्याचा प्रयत्न केला आहे. भगवतगीता हा फक्त भारतातच नव्हे, तर पूर्ण जगभरात पूजनीय आणि अनुकरणीय असा ग्रंथ आहे. त्याबद्दल अपशब्द वापरणे म्हणजेच देशाबद्दल अपशब्द वापरण्यासारखेच आहे. शिवराज पाटील आणि काँग्रेसच्या सडक्या मेंदूचा भाजपा तर्फे आम्ही निषेध करतो आणि हिंदू धर्म आणि धर्मग्रंथावरील टीका सहन केली जाणार नाही. त्यांना जशास तसे उत्तर दिले जाईल, असे सातारा शहराध्यक्ष विकास गोसावी यांनी यावेळी सांगितले

यावेळी सातारा शहराध्यक्ष विकास गोसावी, ग्रामीणचे अध्यक्ष राजेंद्र इंगळे, जिल्हा सरचिटणीस विट्ठल बलशेटवार, उपाध्यक्ष राहुल शिवनामे, युवा मोर्चा जिल्हा अध्यक्ष निलेश नलावडे, अनुसूचित जाती मोर्चा जिल्हाध्यक्ष शैलेंद्र कांबळे, व्यापारी आघाडी जिल्हाध्यक्ष डॉ. सचिन साळुंखे, सिने कलाकार आघाडी जिल्हाध्यक्ष विकास बनकर, अश्विनी हुबळीकर, निलेश शहा, तेजस जमदाडे, प्रवीण शहाणे, जयदीप ठुसे, गणेश पालखे, चंदन घोडके, रीना भणगे, वनिता पवार, महेंद्र कदम, अमित भिसे, प्रिया नाईक, कैलास मोहिते, अविनाश खर्शीकर, अमोल कांबळे, शरद कदम, भीमराव लोखंडे, सुधीर काकडे, साई कारळे, संतोष कदम, पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.