Monday, February 6, 2023

चिपळूणच्या डुक्कराला चिखलात लोळवणारच; राणेंचा भास्कर जाधवांवर नाव न घेता प्रहार

- Advertisement -

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । गेल्या काही दिवसांपासून राज्यात राणे कुटुंबीय विरुद्ध भास्कर जाधव यांच्यातील वाद चव्हाट्यावर आला आहे. त्याच पार्श्वभूमीवर भाजप नेते निलेश राणे यांनी आज नाव न घेता भास्कर जाधव यांच्यावर जोरदार प्रहार केला आहे. चिपळूणच्या या डुक्कराला चिखलातच लोळवणार, नाही तर नावाचा राणे सांगणार नाही असं म्हणत त्यांनी थेट इशारा दिला आहे.

कुडाळ येथे नीलेश राणे यांच्या वतीने संविधान बचाव रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी भाजप आमदार प्रसाद लाड, प्रवीण दरेकर आदींसह भाजपचे नेते उपस्थित होते. यावेळी निलेश राणे म्हणाले, परवा चिपळूणचा डुक्कर कुडाळमध्ये आला. मी त्याला रान डुक्कर म्हणणार नाही. रान डुक्कर जंगलात असतो. हा चिखलातील डुक्कर आहे. याला एक दिवस चिखलातच लोळवणार नाही तर नावाचा राणे सांगणार नाही. अशी जोरदार टीका त्यांनी केली.

- Advertisement -

यावेळी प्रवीण दरेकर यांनीही भास्कर जाधव यांच्यावर सडकून टीका केली . दिवा विझताना जसा फडफडतो तशीच भास्कर जाधव यांची शेवटची फडफड सुरू आहे. चिपळूण-गुहागरमधून भास्कर जाधव कसे निवडून येतात, हेच आता भाजप बघून घेईल असा इशारा दरेकरांनी दिला. तर भास्कर जाधव हे उद्धव ठाकरेंची आयटम गर्ल आहे असं म्हणत भाजप आमदार प्रसाद लाड यांनीही खिल्ली उडवली.