हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांनी 40 समर्थक आमदारांसह बंडखोरी केल्यानंतर राज्यात राजकीय भुकंप झाला आहे. नेत्यांच्या बंडखोरी ने शिवसैनिक आक्रमक झाले आहेत. याच पार्श्वभूमीवर एकनाथ शिंदे यांचे सुपुत्र आणि शिवसेनेचे कल्याण मतदारसंघाचे खासदार श्रीकांत शिंदे यांच्या उल्हासनगरमधील असलेल्या कार्यालयावर दगडफेक करत कार्यालय फोडले आहे.
आज (शनिवार) दुपारच्या सुमारास 4-5 जणांनी श्रीकांत शिंदे कार्यालयाची तोफफोड केली. यावेळी कार्यकर्त्यांनी शिवसेना जिंदाबादच्या घोषणा देखील दिल्या. श्रीकांत शिंदे हे एकनाथ शिंदे यांचे सुपूत्र आहेत. त्यामुळे आता शिंदे गट आणि शिवसेना यांच्यातील संघर्ष अजून तीव्र होण्याची शक्यता आहे. आज सकाळीच दुसरे बंडखोर आमदार तानाजी सावंत यांच्या पुण्यातील कार्यालयावर हल्ला केला होता.
दरम्यान, एकूण राजकीय परिस्थिती पाहता मुंबईत 10 जुलै पर्यत जमावबंदी लागू करण्यात आली आहे. आमदारांनी बंडखोरी केल्यामुळे शिवसेना कार्यकर्ते संतप्त झाले आहेत. त्या पार्श्वभूमीवर पोलीस यंत्रणा अलर्ट मोड वर आहे.