मी बाळासाहेबांचा शिवसैनिक, चुकीचं काम करणार नाही ; अनिल परब यांचं भाजपला खुलं आव्हान

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | सचिन वाझे यांच्या लेटर बॉम्बमुळे राज्याच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे. सचिन वाझे यांनी लिहिलेल्या पत्रात माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यासह परिवहनमंत्री अनिल परब यांच्यावरही गंभीर आरोप केले आहेत. दरम्यान अनिल परब यांनी तात्काळ पत्रकार परिषद घेऊन आपल्या वरील आरोपांचे खंडन केले. मी बाळासाहेबांचा शिवसैनिक आहे.चुकीचं काम कधी करणार नाही असे म्हणत आपण कुठल्याही प्रकारच्या चौकशीला सामोरं जाण्यास तयार असल्याचंही परब यांनी म्हटलंय.

सचिन वाझेनं लिहिलेल्या पत्रात माझ्यावर काही आरोप करण्यात आलेत. ते सर्व आरोप मी धादांत खोटे आहे. मी दिवंगत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा शिवसैनिक आहे. ते माझे दैवत आहे. त्यांची आणि माझ्या दोन मुलींची शपथ घेऊन सांगतो माझ्यावरील आरोपांमध्ये काडीचंही तथ्य नाही. सरकारला बदनाम करण्यासाठी हे कारस्थान सुरू आहे. हफ्तेखोरीचे संस्कार माझ्यावर नाहीत”, असं अनिल परब म्हणाले.

भाजपचे नेते दोन तीन दिवसांपासून आरडा ओरड करत होते. आणखी एक बळी घेऊ म्हणत होते. म्हणजे हे प्रकरण आधीपासून माहिती होतं. सचिन वाझे आज पत्र देणार होता त्यामुळे तिसरी विकेट काढणार असं भाजपला आधीच माहिती होतं. मात्र, मी लढणारा कार्यकर्ता आहे, मी कायदेशीर मार्गाने लढाई लढणार आहे. असेही अनिल परब यांनी म्हंटल.

सचिन वाझेंनं माझ्यावर केलेले आरोप खोटे असून सीबीआय असो, एएनआय असो किंवा मग रॉ आणा. मी सर्व प्रकारच्या चौकशीला सामोरं जायला तयार आहे. इतकंच काय तर माझी नार्को टेस्ट करा त्यासाठीही मी तयार आहे”, असं खुलं आव्हान अनिल परब यांनी दिलं आहे.

राज्यातील सर्व महत्वाच्या ब्रेकिंग बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी हॅलो महाराष्ट्र सोबत जोडले जा. आम्हाला फॉलोअ करा  WhatsApp Group | Facebook Page

Click Here to Join Our WhatsApp Group

Leave a Comment