शिवसेनेने केली गांधी कुटुंबीयांची पाठराखण ; महाराष्ट्रातील ‘बड्या’ नेत्यावर साधला निशाणा

0
42
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | राज्यात महाविकासआघाडीची सत्ता स्थापन झाल्यापासून शिवसेनेने खूप वेळा सोनिया आणि राहुल गांधी यांच्या नेतृत्त्वाचे कौतुक केले होते. आता पुन्हा एकदा काँग्रेस अध्यक्षपदाच्या संदर्भात शिवसेनेने पुन्हा एकदा गांधी कुटुंबीयांची पाठराखण केली आहे. काही दिवसांपूर्वी काँग्रेसमधील २३ ज्येष्ठांनी सोनिया गांधी यांना पत्र पाठवून पक्षनेतृत्त्वाविषयी शंका उपस्थित केली होती. या नेत्यांमध्ये महाराष्ट्रातील काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण, मुकूल वासनिक, आणि मिलिंद देवरा यांचाही समावेश होता.

या पार्श्वभूमीवर शिवसेनेने या ज्येष्ठांना त्यांच्या मर्यादांची जाणीव करून चांगकेच फटकारले आहे. पत्र लिहणारे नेते सत्तरी ओलांडलेले आहेत. देशपातळीवर सोडा पण राज्य किंवा जिल्हापातळीवरही लोकनेता म्हणून त्यांची ओळख नाही. सोनिया गांधी यांच्याकडे सक्रियतेचा आणि अध्यक्ष बदलीचा आग्रह धरणाऱ्या या नेत्यांना पक्षाला सक्रिय करण्यासाठी कोणी रोखले होते? यापैकी अनेकांनी काँग्रेस किंवा नेहरू-गांधी परिवाराच्या बळावर मुख्यमंत्रीपदापासून केंद्रीय मंत्रीपदापर्यंतच्या अनेक महत्त्वाच्या गाद्या मळल्या आहेत, याची आठवण शिवसेनेने करून दिली आहे.

त्याचप्रमाणे पृथ्वीराज चव्हाण, मिलिंद देवरा यांच्याविषयी आम्ही जास्त काय बोलावे? साताऱ्यात निवडून येण्यासाठी पृथ्वीराज चव्हाणांना शरद पवारांची मदत घ्यावी लागते. या सर्व मंडळींनी सोनिया गांधी यांच्याकडे पक्षाला सक्रिय अध्यक्ष हवा, अशी मागणी केल्याची मोठी गंमत वाटते. मुळात पक्षाला सक्रिय करण्यासाठी या नेत्यांना कोणी रोखले आहे? सोनिया गांधी यांनी पक्षांतर्गत संगीत खुर्ची, खो-खो, हुतूतू, आटपाट्यांचे सामने भरवून सक्रियता दाखवावी, असे या मंडळींना वाटते काय, असा सवालही शिवसेनेने काँग्रेसमधील ज्येष्ठांना विचारला आहे.

राहुल गांधी हे सक्रिय होतेच व त्यांनी एकाकीपणे मोदी-शहांना अंगावर घेतले व भाजपला टक्कर दिली होती.विधानसभा निवडणुकीत त्यांनी देश पालथा घातला. भाजपकडून त्यांच्यावर कमरेखालची टीका झाली तेव्हा काँग्रेसचे ‘सक्रिय’ पुढारी कुठे होते? राहुल गांधी यांचे खच्चीकरण मोदी-शहांच्या भाजपने केले नसेल तेवढे पक्षांतर्गत जुन्या नेत्यांनी केले आहे, अशी टीकाही शिवसेनेकडून करण्यात आली आहे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7875002893 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘hello news’

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here