सूर्य-चंद्र तुमच्या बापाचे नोकर नाहीत ; कर्नाटक सीमाप्रश्नी शिवसेनेचा हल्लाबोल

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | सीमाप्रश्नी 69 हुतात्मे देणारा शिवसेना हा एकमेव पक्ष होता . ‘‘सूर्य-चंद्र असेपर्यंत बेळगाव कर्नाटकातच राहील,’’ अशी अरेरावीचे भाषा कर्नाटकचे उपमुख्यमंत्री लक्ष्मण सवदी करत आहेत. सूर्य-चंद्र महाराष्ट्रासही तेजाने प्रकाशमान करीत असतात. आचार्य अत्रे यांच्याच भाषेत सांगायचे तर ‘‘सूर्य-चंद्र तुमच्या बापाचे नोकर नाहीत.’’ याद राखा!, असा हल्लाबोल शिवसेनेनं कर्नाटकच्या उपमुख्यमंत्र्यांवर केला आहे. तसेच सूर्य-चंद्राच्याच साक्षीने कर्नाटकातून तुमची अरेरावी नष्ट होईल व मराठी बांधवांचा लढा यशस्वी होईल! असेही शिवसेनेनं सामनाच्या अग्रलेखात म्हटलं आहे.

नक्की काय म्हंटल आहे सामना अग्रलेखात

“महाराष्ट्राची बांधिलकी बेळगावसह संपूर्ण सीमा बांधवांशी आहे. सीमाप्रश्नी 69 हुतात्मे देणारा शिवसेना हाच एकमेव पक्ष आहे. सीमा प्रश्नासाठी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी प्रदीर्घ तुरुंगवास भोगला आहे. ‘‘सूर्य-चंद्र असेपर्यंत बेळगाव कर्नाटकातच राहील,’’ अशी अरेरावीचे भाषा कर्नाटकचे उपमुख्यमंत्री लक्ष्मण सवदी करत आहेत. त्यांनी एक लक्षात घ्यावे, सूर्य-चंद्र महाराष्ट्रासही तेजाने प्रकाशमान करीत असतात. आचार्य अत्रे यांच्याच भाषेत सांगायचे तर ‘‘सूर्य-चंद्र तुमच्या बापाचे नोकर नाहीत.’’ याद राखा!, सूर्य-चंद्राच्याच साक्षीने कर्नाटकातून तुमची अरेरावी नष्ट होईल व मराठी बांधवांचा लढा यशस्वी होईल!” असेही शिवसेनेनं सामनाच्या अग्रलेखात म्हटलं आहे.

सीमाभागातील लोकांना पाठिंबा म्हणून महाविकास आघाडीतील नेत्यांनी हाताला काळ्या फिती बांधून आंदोलन केले. या आंदोलनात भाजपसाहित इतर विरोधी पक्ष सामील झाले असते तर मराठी ऐक्याचे जोरदार प्रदर्शन कानडी नेत्यांना झाले असते. निदान दोन विरोधी पक्षनेत्यांनी तरी दंडास काळ्या फिती बांधून मराठी जनांच्या भावनेचा मान राखायला हवा होता. कर्नाटक मध्ये भाजपचे राज्य असून तिथे मराठी बांधवावर अत्याचार सुरू असतील तर महाराष्ट्रातील भाजप पुढाऱ्यांचे मन अश्रूंनी भिजलेच पाहिजे. तसे का झाले ते माहीत नाही. नाही म्हणल तरी चंद्रकांत पाटलांनी बेळगाव सह मराठी भाषिक गावे महाराष्ट्रात यायला हवे असे म्हणल्याच प्रसिद्ध झाले आहे, त्याबद्दल चंद्रकांत पाटील यांचे आभार… पण सीमाप्रश्नी 69 हुतात्मे देणारा शिवसेना हा एकमेव पक्ष होता असंही सामना अग्रलेखात म्हटलं आहे.

महाराष्ट्रातील नेते कितीही ओरडत असले तरी जोपर्यंत सूर्य-चंद्र आहेत तोपर्यंत बेळगाव कर्नाटकातच राहणार असल्याची आरोळी तेथील उपमुख्यमंत्री लक्ष्मण सवदी यांनी ठोकली आहे. अशा आरोळय़ांची पर्वा न करता गेल्या 70 वर्षांपासून सीमा भागातील मराठी बांधवांचा लढा सुरू आहे. हा जो कोणी लक्ष्मण सवदी गोधडीत रांगत होता त्याआधीपासून 20 लाख मराठी बांधव महाराष्ट्रात येण्यासाठी संघर्ष करीत आहेत. सध्या बेळगावचा तिढा सर्वोच्च न्यायालयात लटकला आहे. त्यामुळे आता न्यायालयच काय ते ठरवेल. सूर्य-चंद्र आकाशात आहेत की नाहीत हे पाहून सर्वोच्च न्यायालय बेळगावप्रश्नी निकाल देणार नाही आणि सूर्य-चंद्र हे काही कुणाच्या बापाचे नोकर नाहीत, असा हल्लाबोल शिवसेनेनं केला आहे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7875002893 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘Hello News’

Leave a Comment