औरंगाबाद | शहरातील सर्व व्यापाऱ्यांना सोबत घेऊन ३१ मे नंतर दुकाने उघडण्याचा इशारा खासदार इम्तियाज जलील यांनी राज्यसरकारला दिला होता. त्यानंतर माजी खासदार चंद्रकांत खैरे यांनी त्यांना विरोध करित दुकाने जर उघडले त तर शिवसैनिक त्यांना उत्तर देतील असा इशारा दिला होता. यानंतर खैरे विरुद्ध जलील असा वाद उफाळला होता.
आज खैरे यांना इम्तियाज जलील यांच्या भूमिकेबद्दल विचारले असता, “माझी आणि त्याची बरोबरी करू नका तो काही मोठा माणूस नाही. चार वेळा मी खासदार आहे, दोन वेळा आमदार झालो, पाच वर्ष जिल्ह्याचा पालकमंत्री झालो त्याची न माझी बरोबरी होऊच शकत नाही. तो आज खासदार आहे उद्या होणार नाही.म्हणून माझी न त्याची बरोबरी करू नका” असे हॅलो महाराष्ट्रशी बोलताना शिवसेना नेते खैरे म्हणाले.
राज्यातील लॉकडाऊन आणि व्यापऱ्यासंदर्भात १ तारखेनंतर त्या संदर्भात चांगला निर्णय घेणार आहे.आज रात्री कॅबिनेटमध्ये त्या संदर्भात निर्णय घेणार आहे असेही खैरे म्हणाले.