Saturday, March 25, 2023

कॅलिफोर्नियामध्ये गोळीबार: अनेकांच्या मृत्यूची भीती तर बरीच लोकं जखमी, हल्लेखोरही ठार

- Advertisement -

कॅलिफोर्निया | अमेरिकेतील कॅलिफोर्निया येथील सॅन जोसे येथे झालेल्या गोळीबाराच्या घटनेत बर्‍याच जणांनी आपला जीव गमावला, तर अनेक लोकं जखमी झाले. प्रशासनाने या प्रकरणाची माहिती दिली. बुधवारी सकाळी सॅन जोसे सिटीच्या उत्तरेकडील व्हॅली ट्रांसपोर्टेशन अथॉरिटी यार्ड मध्ये गोळीबाराची घटना घडली.

सान्ता क्लारा काउंटी शेरीफच्या अधिकाऱ्यांनी बुधवारी सकाळी एका संक्षिप्त वेळी सांगितले की, या क्षणी या घटनेशी संबंधित अधिक माहिती मिळू शकली नाही. परंतु या घटनेत बऱ्याच लोकांचा मृत्यू होण्याची शक्यता असून अनेक लोकं जखमी झाले आहेत. किती लोकांचा मृत्यू झाला आहे याची पुष्टी त्यांनी अद्याप केलेली नाही. पण ते म्हणतात की,”बळी पडलेल्यांपैकी अनेक लोकं लोक व्हॅली ट्रांसपोर्टेशन अथॉरिटी यार्डशी संबंधित आहेत.”

- Advertisement -

या घटनेत हल्लेखोरही मरण पावला असे अधिकाऱ्यांनी सांगितले. बातमी लिहीपर्यंत हल्लेखोर कोण आहे हे ओळखता आलेले नाही.

राज्यातील सर्व महत्वाच्या ब्रेकिंग बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आमचा WhatsApp ग्रुप Join करा

Click Here to Join Our WhatsApp Group