Sunday, April 2, 2023

महाविकास आघाडी सरकार २५ वर्ष टिकेल; राष्ट्रवादीचं चंद्रकांतदादांना प्रत्युत्तर

- Advertisement -

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राज्यातील महाविकास आघाडीचे सरकार महाराष्ट्र झोपेत असतानाच पडेल असा दावा करत राजकीय खळबळ उडवून देणाऱ्या भाजप नेते चंद्रकांत पाटील याना राष्ट्रवादी काँग्रेसने चोख प्रत्युत्तर दिले आहे. राष्ट्रवादीचे नेते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी हे सरकार 25 वर्ष चालेल अस म्हणत चंद्रकांत पाटलांवर पलटवार केला आहे.

जनता झोपेत असताना आघाडी सरकार निर्णय घेत नाही तर लोकांच्या समोर निर्णय घेते. आघाडी सरकार एकजुटीने काम करतेय. ‘ऑपरेशन लोटस’ केले पाहिजे अशी काही लोकांची इच्छा आहे. परंतु ते शक्य होत नाहीय. काहींना सरकार येईल असे स्वप्न पडत आहे. मात्र हे आघाडी सरकार पाच वर्षे पूर्ण करेलच शिवाय मुख्यमंत्र्यांनी सांगितल्याप्रमाणे २५ वर्ष टिकेल. त्यामुळे २५ वर्ष स्वप्न बघतच रहा, असा पलटवार नवाब मलिक यांनी केला आहे.

- Advertisement -

चंद्रकांत पाटील नक्की काय म्हणाले –

अठरा महिन्यांपूर्वी सरकार आलं तेव्हाच महाविकास आघाडीतील नेत्यांनी घरी जाण्याची मानसिकता बनवली आहे. आपण फार काळ सत्तेत राहणार नाही याची जाणीव त्यांना झाली आहे. तरीही अठरा महिने हे सरकार टिकले आहे. सध्या त्यांचा बोनस काळ सुरू आहे. त्यामुळे जसे झोपेत असताना सरकार आले, तसे महाराष्ट्र झोपेत असतानाच हे सरकार पडेल.

ब्रेकिंग बातम्या सर्वांत अगोदर मोबाईलवर मिळवण्यासाठी आमचा 9028429273 हा नंबर तुमच्याकडील WhatsApp ग्रुपला Add करा.