शिवसेना नेते अरविंद सावंत यांचा केंद्रीय मंत्री पदाचा राजीनामा

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

मुंबई प्रतिनिधी । मोदी सरकार २ मध्ये अवजड व उद्योग मंत्री म्हणून शपथ घेतलेले शिवसेनेचे खासदार अरविंद सावंत यांनी अखेर आपला राजीनामा दिला आहे. सद्या महाराष्ट्रातील सत्तास्थापनेवरुन युती मध्ये कटुता निर्माण झाली आहे.

राजीनाम्याबाबतची भूमिका अरविंद सावंत यांनी ट्विटर वर सविस्तरपणे मांडली आहे, “लोकसभा निवडणुकी आधी जागा वाटप आणि सत्ता वाटपाचा एक फॉर्म्युला ठरला होता. दोघांना तो मान्य होता. आता हा फॉर्म्युला नाकारून शिवसेनेला खोटे ठरवण्याचा प्रकार धक्कादायक तसेच महाराष्ट्राच्या स्वाभीमानास कलंक लावणारा आहे. खोटेपणाचा कळस करत महाराष्ट्रात भाजपाने फारकत घेतलीच आहे. शिवसेनेची बाजू सत्याची आहे. अशा खोट्या वातावरणात दिल्लीतील सरकार मध्ये तरी का रहायचे ? आणि म्हणूनच मी केंद्रीय मंत्री पदाचा राजीनामा देत आहे. या संदर्भात आज सकाळी ११.०० वा. दिल्ली येथे मी पत्रकार परिषद घेणार आहे.”


Leave a Comment