ठाकरे सरकार कोसळेल अशा पैजा लागल्या होत्या, पण.. – संजय राऊत

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

पुणे । ”आम्ही सत्ते आलो तेव्हा आमच्या सरकारला हिणवलं गेलं. ठाकरे सरकार अल्पावधीतच कोसळेल अशा पैजा लागल्या होत्या. पण पुढच्या महिन्यात आम्ही एक वर्ष पूर्ण करत आहोत,” असा टोला शिवसेना खासदार संजय राऊत यांनी काढला. पुण्यात श्रमिक पत्रकार संघाने आयोजित केलेल्या चर्चासत्रात संबोधित करताना संजय राऊत यांनी आज तुफान फटकेबाजी केली.

राज्यात तीन पक्षाचं सरकार आलं. तेव्हा हे सरकार जास्त दिवस चालणार नाही, असं सांगितलं गेलं होतं. ठाकरे सरकार लवकर कोसळेल अशा पैजा लावल्या होत्या. पण पुढच्या महिन्यात आम्ही आता एक वर्ष पूर्ण करत आहोत, असा टोला राऊत यांनी विरोधकांना लगावला. राज्यातील सरकार पडणार नाही. राज्यातील सरकार पडेल असं केंद्रातील नेत्यांनी कधीच म्हटलं नाही. राज्यातील नेते म्हणायचे. त्यांनीही आता असं बोलणं बंद केलं आहे, असंही ते म्हणाले. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे असताना राज्याच्या राजकारणाचा केंद्रबिंदू मुंबईत होता. आता महाराष्ट्राचा राजकारणाचा केंद्रबिंदू पुण्यात आहे, असं सूचक विधानही त्यांनी केलं.

मोदी आणि अमित शहांपैकी कुणाची भीती वाटते?
पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शहांपैकी कुणाची भीती वाटते? असा सवाल त्यांना करण्यात आला. त्यावर मोदी आणि शहा यांची भीती वाटत नाही. तसं कारणही नाही. भीती वाटत असेल तर त्यांच्या लोकांना वाटली पाहिजे. आम्हाला वाटण्याचं कारण नाही. पाप केलं नाही तर भीती कशाची?, असा सवालही त्यांनी केला. शरद पवार यांचीही भीती वाटत नाही. पण लोकांमध्ये जाणारा लोकनेता आम्ही पाहिला नाही. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनाही लोक घाबरायचे. पण त्यांना भेटायचे तेव्हा त्यांच्या प्रेमात पडायचे, असंही त्यांनी सांगितलं.

https://twitter.com/HelloMaharashtr/status/1322409533218512896?s=20

महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातील ब्रेकिंग बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आमचा 7972630753 हा संपर्क क्रमांक Hello News या नावाने सेव्ह करा. तुमचे नाव आणि जिल्हा आम्हाला इथे कळवा. ब्रेकिंग बातम्यासाठी लॉगइन : www.hellomaharashtra.in

Leave a Comment