शिवसेनेला साताऱ्यात मोठा धक्का; ‘या’ बड्या नेत्यासह अनेक शिवसैनिक शिंदे गटात सामील, Z.P, पं.स. निवडणुकाही लढवणार

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सातारा प्रतिनिधी । शुभम बोडके

शिवसेना नक्की कोणाची यावरून उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांच्यात जोरदार रस्सीखेच सुरु असल्याचे चित्र सध्या दिसत आहे. अनेक जिल्ह्यात शिवसैनिकांमध्ये शिंदे गट अन ठाकरे गट अशी फूट पडलेली दिसत आहे. पुणे जिल्ह्यापाठोपाठ आता सातारा जिल्ह्यातही शिवसेनेला मोठा धक्का बसला आहे. शिवसेनेचे नेते पुरुषोत्तम जाधव यांनी अनेक शिवसैनिकांसह शिंदे गटाला आपला पाठिंबा जाहीर केला आहे. सातारा येथे पत्रकार परिषद घेऊन जाधव यांनी आपली भूमिका मांडली.

एकनाथ शिंदेंनी बंडखोरी नाही तर क्रांती केली आहे. सातारा जिल्हा हा क्रांतिकारकांचा जिल्हा म्हणून ओळखला जातो. शिंदे साहेब हे सुद्धा सातारा जिल्ह्याचे सुपुत्र असून त्यांनी बंद करून क्रांती केली आहे असे मत पुरुषोत्तम जाधव यांनी व्यक्त केले. तसेच सातारा जिल्ह्यातील अनेक प्रलंबित प्रश्न मार्गी लावण्याचा शब्दही शिंदे यांनी दिला असल्याचं जाधव यांनी यावेळी बलताना सांगितले.

तसेच आगामी पंचायत समिती निवडणूक, जिल्हा परिषद निवडणुकाही आमचा जो गट आहे तो ताकदीने लढवेल अशी माहिती पुरषोत्तम जाधव यांनी दिली आहे. यामुळे आता जिल्ह्यातील राजकारणात अनेक राजकीय समीकरणं बदलण्याची चिन्हे दिसत आहेत. या सर्व गोष्टींचा भाजपला मोठा फायदा होण्याची शक्यता असून यामुळे शिवसेना जिल्ह्यात बॅकफूटवर फेकली जाऊ शकते.

दरम्यान, सातारा जिल्ह्यात आता उद्धव ठाकरे यांना नवा ताकदीचा चेहरा शोधावा लागणार आहे. सातारा जिल्ह्यातील शिवसेनेच्या शंभूराज देसाई अन महेश शिंदे अशा दोन्ही आमदारांनी शिंदे गटाला पाठिंबा दिल्याने आता आगामी निवडणुकांसोबतच जिल्ह्याची धुरा सांभाळण्यासाठी शिवसेनेला नवा चेहरा शोधणे गरजेचे आहे.