Wednesday, March 29, 2023

तेजस ठाकरे म्हणजे ठाकरे कुटुंबाचे व्हिव्हियन रिचर्डस्; ‘या’ नेत्यानं दिल्या अनोख्या शुभेच्छा

- Advertisement -

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | शिवसेना पक्षप्रमुख आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे चिरंजीव तेजस ठाकरे यांचा आज वाढदिवस. त्यानिमित्ताने तेजस ठाकरेंवर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. त्यातच आता शिवसेना नेते मिलिंद नार्वेकर यांनी हटके अंदाजात तेजस ठाकरे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देत सर्वांचे लक्ष वेधून घेतले. तेजस ठाकरे म्हणजे ठाकरे कुटुंबाचे व्हिव्हियन रिचर्डस् अशा शब्दांत नार्वेकर यांनी त्यांचे कौतुक केलं.

नार्वेकर यांनी दैनिक सामनातून तेजस ठाकरे यांची तुलना वेस्ट इंडिजचे महान खेळाडू व्हीवीयन रिचर्डस् यांच्याशी केलं आहे. सर व्हीवीयन रीचर्ड आणि तेजस ठाकरे यांच्या चेहऱ्यात बरंच साम्य दिसून येत असल्याचं दिसून येत आहेत. तेजस यांचा लूक रिचर्डस् यांच्यासारखाच असल्याने नार्वेकर यांनी त्यांची तुलना रिचर्डस् यांच्याशी केली असावी असं सांगितलं जातं

- Advertisement -

कोण आहेत तेजस ठाकरे –

तेजस ठाकरे हे मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचे सुपुत्र असून अद्याप ते सक्रिय राजकारणात उतरले नाहीत. विधानसभा निवडणुकीच्या प्रचारावेळी तेजस यांचे दर्शन घडले होते. आदित्य ठाकरे पहिल्यांदा निवडणुकीच्या रिंगणात उतरल्याने तेजस यांनी प्रचारात सहभाग घेतला होता. ठाकरे कुटुंबात तेजस ठाकरे आक्रमक आहेत म्हणून त्यांचा उल्लेख व्हिव्हियन रिचर्डस् म्हणून केला आहे. तर, आदित्य ठाकरे हे सुनील गावस्कर प्रमाणे संयमी आहेत, असंही मिलिंद नार्वेकर यांनी म्हटलं होत.