हिंगोली । ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांच्या राष्ट्रवादीमधील प्रवेशानंतर भाजपाला सोडचिठ्ठी देण्यात आता पुढील नंबर पंकजा मुंडेंचा असल्याचे बोलले जात आहे. खडसेंप्रमाणे पंकजही भाजपवर नाराज असल्याचे बोलले जात आहे. अशा वेळी पंकजा शिवसेनेत प्रवेश करणारा असल्याच्या चर्चेला ऊत आला आहे. शिवसेना नेते जाणीवपूर्वक पंकजा मुंडेंना पक्षात घेणार असल्याच्या कयासांना खतपाणी घालत आहेत.(Pankaja Munde)
अशातच शिवसेनेचे हिंगोलीचे खासदार हेमंत पाटील (Hemant Patil) यांनीही पंकजांना सेना प्रवेशाचे आवताण दिले आहे. हेमंत पाटलांसह शिवसेनेचे पदाधिकारी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांची भेट घेऊन पंकजांना सेनेत बोलवण्यासाठी विनंती करणार आहेत.
“भाजप नेत्या पंकजा मुंडे यांना भाजपमध्ये मान मिळत नाही. पंकजा मुंडे शिवसेनेत आल्यास त्यांचं स्वागतच आहे. पंकजा मुंडे यांना शिवसेनेत आणण्यासाठी आम्ही शिवसेनेचे सर्व पदाधिकारी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेणार आहोत. पंकजा मुंडे शिवसेनेमध्ये आल्यास मराठवाड्यात शिवसेनेला बळ मिळेल.” असा विश्वास हेमंत पाटील यांनी व्यक्त केला. याआधी शिवसेना प्रवक्ते आणि सार्वजनिक पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील, माजी राज्यमंत्री अर्जुन खोतकर यांनी आतापर्यंत पंकजांना पक्षात बोलावले आहे. (Shivsena MP Hemant Patil to meet CM Uddhav Thackeray invites Pankaja Munde in party)
ब्रेकिंग बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आमचा 7972630753 हा संपर्क क्रमांक Hello News या नावाने सेव्ह करा. तुमचे नाव आणि जिल्हा आम्हाला इथे कळवा. ब्रेकिंग बातम्यासाठी लॉगइन : www.hellomaharashtra.in