भगवा झेंडा महाराष्ट्राची शान, भगव्याला विरोध करणारे नतद्रष्ट ; संजय राऊतांनी घेतला समाचार

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | महाराष्ट्रातील सरकारी कार्यालयांवर भगवा ध्वज फडकवण्याविरोधात आपण सुप्रीम कोर्टात जाऊ शकतो, असं गुणरत्न सदावर्ते यांनी म्हटलं होतं. यावर शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊतांना प्रश्व विचारण्यात आला. त्यावर भगवा होता म्हणून तिरंगा निर्माण झाला, असं म्हणत भगव्याला विरोध करणारे नतद्रष्ट आहेत अशा शब्दात गुणरत्न सदावर्ते यांचा समाचार घेतला.

भगवा झेंडा लावणं ही महाराष्ट्राची शान आणि प्रतिष्ठा आहे. ज्या दिवसाने आम्हाला स्वातंत्र्याची, स्वाभिमानाची प्रेरणा दिली, त्याला विरोध करणारे नतद्रष्ट आहेत. अशा घुबडांची काळजी न करता छत्रपती शिवाजी महाराजांची प्रतिष्ठा राहिल, अशी कार्यवाही सरकारने त्या लोकांवर करावी”, असे संजय राऊत यांनी म्हंटल.

ते पुढे म्हणाले, भगवा झेंडा हा महाराष्ट्राच्या सरकारी कार्यालयांवर फडकणे, हा आपला स्वाभिमान आहे, आपलं स्वप्न आहे, तसेच तिरंग्याचा हा अपमान जर कुणी म्हणत असेल तर अजिबात अपमान नाही. तसेच ज्याला भगव्याचं महत्त्व कळत नसेल, आणि महाराष्ट्राच्या मातीचं महत्त्व समजत नसेल तर त्यांना महाराष्ट्रात राहण्याचा अधिकार नाही.

ब्रेकिंग बातम्या सर्वांत अगोदर मोबाईलवर मिळवण्यासाठी आमचा 9028429273 हा नंबर तुमच्याकडील WhatsApp ग्रुपला Add करा.

Leave a Comment