राम मंदिरावर घोटाळ्याचा डाग, मोदी आणि भागवतांना हस्तक्षेप करावाच लागेल : शिवसेना

0
54
modi
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

राम मंदिरावर घोटाळ्याचा डाग, मोदी आणि भागवतांना हस्तक्षेप करावाच लागेल : शिवसेना

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन : सध्या काही राजकीय नेते आणि राम मंदिर ट्रस्ट यांच्यामध्ये वाद चालू आहे. या वादावरूनच एखाद्या घोटाळ्याचा डाग राम मंदिरावर पडत असेल तर पंतप्रधान मोदी आणि सरसंघचालक भागवत यांना त्यात हस्तक्षेप करावाच लागेल असं शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या ‘सामना’च्या आजच्या आग्रलेखतून म्हंटले आहे.

हे राष्ट्रीय अस्मितेचे कार्य

अयोध्येतील राम मंदिर उभारणीचे काम, त्यामागचा व्यवहार पारदर्शक प्रामाणिक पद्धतीने व्हावा. राम भक्तांच्या श्रद्धेला तडा जाईल असे काही घडू नये. अशी अपेक्षा असतानाच जमीन व्यवहाराचे संशयास्पद प्रकरण समोर आले आहे. ते खरे की खोटे याचा लगेच खुलासा झाला तर बरे!. राम मंदिर कार्य हे राष्ट्रीय अस्मितेचे कार्य आहे. या कार्याची कोणी जाणीवपूर्वक बदनामी करत असेल तर त्यांच्यावरही कारवाई होणे गरजेचे आहे. अयोध्येतील राम मंदिर हे राम भक्तांचा त्याग, संघर्ष, बलिदानातून उभा राहिले हाच इतिहास आहे. एखाद्या घोटाळ्याचा डाग त्या मंदिरावर पडत असेल तर पंतप्रधान मोदी आणि सरसंघचालक भागवत यांना त्यात हस्तक्षेप करावाच लागेल. असे शिवसेनेचे मुखपत्र ‘सामना’ मधून म्हंटले आहे.

राम मंदिर निर्माण मागं नक्की काय गडबड

अयोध्येतील प्रभू श्रीरामांचा भव्य मंदिर बनावे ही जगभरातील तमाम हिंदूंची इच्छा आहे. त्या मंदिरासाठी हिंदूंना मोठा लढा त्यांच्यात हिंदुस्थानात द्यावा लागला. आयोध्येचा भूमीवर साधुसंत करसेवकांनी रक्त सांडलं शरयू नदी हिंदूंच्या रक्ताने लाल झाली. फक्त दहा मिनिटांपूर्वी दोन कोटींना घेतलेली जमीन राम मंदिर निर्माण होण्यास 18.5 कोटींना विकत घेतल्याचा स्फोट संजय सिंह यांनी केला. या सर्व प्रकरणाची सीबीआय आणि एवढे करून चौकशीची मागणी समोर आल्याने राम मंदिर निर्माण मागं नक्की काय गडबड सुरू आहे असा संशयाचा धूर निघाला आहे. असं शिवसेनेने म्हटले आहे.

काही मिनिटांतच जमिनीचा भाव वाढला कसा ?

आयोध्या मध्ये श्रीरामाचा भव्य मंदिर साधारण 60 एकर परिसरामध्ये उभे राहत आहेत. त्यासाठी जमीन संपादन करावी लागत आहे. बाबा हरिदास यांनी या जमीन सुलतान अन्सारी आणि रवी मोहन तिवारी यांना विकली त्यानंतर त्यांनी ही जमीन रामजन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्टला विकली. हा व्यवहार फक्त दोन पाच मिनिटात झाला. बाबा हरिदास यांनी ही जमीन दोन कोटींना विकली. पुढच्या काही मिनिटातच ही जमीन राम मंदिर ट्रस्ट ला 18.5 कोटींना विकली. काही मिनिटातच जमिनीचा भाव 2 कोटींवरून 18.5 कोटी कसा काय होऊ शकतो? असा सवाल सेनेने उपस्थित केला आहे.

चंपत राय  यांनी संभ्रम दूर करावा

आयोध्या चे महापौर ऋषिकेश उपाध्याय व ट्रस्टचे विश्वस्त अनिल मिश्रा यांच्या उपस्थितीत हा व्यवहार झाला. मुख्य म्हणजे 17 कोटी रुपये संबंधितांच्या खात्यावर जमा करण्यात आले. हे सर्व प्रकरण नक्की काय आहेत याविषयी संभ्रम आहे तो संभ्रम दूर करण्याचं काम रामजन्मभूमी चे प्रमुख महासचिव चंपत राय यांनाच कराव लागेल असे देखील शिवसेनेने म्हटला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here