बाळासाहेबांनी आम्हाला महिलाच्या सन्मानासाठी लढायला शिकवलं आहे ; राऊतांचा विरोधकांना टोला

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | अभिनेत्री कंगना राणावतला हरामखोर हा वादग्रस्त शब्द वापरल्यानंतर  विरोधकानी शिवसेना नेते संजय राऊत याना घेरण्याचा प्रयत्न केला आहे. त्याला आता संजय राऊत यांनी ट्वीट द्वारे उत्तर दिले आहे. बाळासाहेबांनी आम्हाला महिलाच्या सन्मासाठी लढायला शिकवलं आहे, असा टोला शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी विरोधकांना लगावला आहे.

संजय राऊत म्हणाले , “शिवसेनेने हिंदुत्वाचे आदर्श असणारे छत्रपती शिवाजी महाराज आणि महाराणा प्रताप यांच्यासारख्या महान पुरुषांच्या विचारसरणीनुसार वाटचाल केली आहे. त्यांनी आम्हाला महिलांचा सन्मान करण्याची शिकवण दिली आहे. मात्र काहीजण मुद्दाम शिवसेनेने महिलांचा अपमान केला अशी माहिती पसरवत आहे. मात्र सर्वांनी एक गोष्ट विसरता कामा नये की असे आरोप करणाऱ्यांनी मुंबईचा आणि मुंबा देवीचा अपमान केला आहे. शिवसेना महिलांच्या सन्मासाठी लढत राहील, शिवसेना प्रमुखांनी आम्हाला हीच शिकवण दिली आहे,” अशी प्रतिक्रिया संजय राऊत यांनी ट्विटवरुन दिली आहे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7875002893 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘hello news’