मुंबई | नरेंद्र मोदी सध्या इमेल द्वारे मुलाखती देत आहेत. त्याचा खरपूस समाचार सामना वृत्तपत्रातून घेतला आहे.इमेल द्वारे मुलाखत देणे म्हणजे उपप्रश्नापासून लपणे होय. फेकूगिरी करणाऱ्या व्यक्तीला उप प्रश्न जर विचारले गेले नाहीत तर ती मुलाखत कसली. मोदी दर महिन्याला मन की बात करतात दुसऱ्या दिवशी पेपरवाले छापतात. मोदींसारख्या व्यक्तीला हे शोभणारे नाही. निवडणुकीपूर्वी मीडिया मोदींचा मित्र होता मग आता वैरी का झाला असा सवाल शिवसेनेच्या मुखपत्रातून केला आहे.
देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी असे मीडिया पासून पळतात ये बरे दिसत नाही. मोदींनी त्यांच्या चार वर्षाच्या कार्यकाळात एक ही पत्रकार परिषद घेतली नाही असा घणाघाती टोला सामन्यातून लगावला आहे.
मागील काही दिवसापूर्वी नरेंद्र मोदींनी इमेल द्वारे टाइम्स ऑफ इंडिया आणि दैनिक भास्कर या वृत्तपत्राला मुलाखती दिल्या आहेत. त्यात त्यांनी विरोधी पक्षांवर टीका केली आहे तसेच २०१९ची लोकसभा निवडणूक जिंकण्याचा आत्मविश्वास बोलून दाखवला आहे.
Home ताज्या बातम्या मोदींनी फेकूगिरी थांबवावी, पंतप्रधानांच्या इमेल मुलाखतीचा सामनाने घेतला खरपूस समाचार