ड्रायव्हर मुख्यमंत्री चालेल पण राणे सारखा डराव डराव करणारा बेडूक नको – विनायक राऊत

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | नारायण राणे आणि शिवसेना यांच्यातील वाद काही नवा नाही. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची तुलना ड्रायव्हरशी केल्याने शिवसेनेचे खासदार विनायक राऊत यांनी भाजप नेते नारायण राणे यांच्यावर सडकून टीका केली. “महाराष्ट्राचा रथ विकासाकडे घेऊन जाणारा ड्रायव्हर मुख्यमंत्री आम्हाला चालेल. मात्र नारायण राणे सारखा डराव डराव करणारा बेडूक आम्हाला नको”, अशी जहरी टीका विनायक राऊत यांनी केला.

“नारायण राणे म्हणजे नेमकं रसायन काय हे संपूर्ण महाराष्ट्र जाणतो. त्यामुळे राणेंच्या बकवासगिरीला उत्तर देण्याची आम्हाला गरज नाही” असेही विनायक राऊत यांनी म्हंटल आहे.

तसेच मराठा समाजाला आरक्षण देण्याची जबाबदारी महाविकास आघाडी सरकारने घेतली आहे. सरकार ती जबाबदारी पूर्णपणे पार पाडणार. मात्र भाजपने सत्तेत असताना नेमके काय दिवे लावले? असा सवाल देखील केला असून आम्ही सर्वजन मराठा समाजासोबत आहोत. महाराष्ट्र सरकार तुम्हाला न्याय देणार म्हणजे देणार”, असं आश्वासनही विनायक राऊत यांनी दिलं.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘Hello News’

Leave a Comment