मुंबई प्रतिनिधी । लोकसभा निवडणुकीच्या वेळी युतीचा फॉर्म्युला निम्मा निम्मा असाच ठरला होता. जागा वाटप करताना आम्ही कमी जागा घेतल्या. आता मुख्यमंत्रीपदासाठी तडजोड केली जाणार नाही. अमित शहा आता बोलणी करायला येतील त्यावेळी पारदर्शकतेने काय निर्णय घ्यायचा तो विचार करू असं म्हणत उद्धव ठाकरे यांनी या निकालाने आमचे डोळे उघडले असल्याचं सांगितलं आहे.
दरम्यान शाहू,फुले, आंबेडकरांच्या महाराष्ट्रात आम्ही चांगलं प्रशासन देण्याचा विचार करत असून राष्ट्रवादीसोबत जायचं की नाही याचा विचार अजून डोक्यात नसल्याचं उद्धव ठाकरे पुढं बोलताना म्हणाले. जनतेने दिलेला कौल आम्हांला मान्य असून स्थिर सरकार देण्याच्या दृष्टीने आम्ही प्रयत्न करणार असल्याचही ठाकरे म्हणाले.