‘युतीच सोडा? वरून ठोका म्हणून आदेश आला तर ठोकणार, दिवाकर रावतेंचा भाजप ला इशारा

Shivsena sabha in Pandharpur
Shivsena sabha in Pandharpur
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

औरंगाबाद प्रतिनिधी | निवडणुकीसाठी जागावाटपाच्या मागणीबाबत शिवसेनेचा एकही प्रस्ताव अद्याप आमच्या समोर आलेला नाही. त्यांनी तो मांडला नाही. जागा वाटपाची एकही बैठक अजून झालेली नाही. युती झाली नाही, तरी गेल्या लोकसभा निवडणुकीपेक्षा एक जास्तीची जागा आम्ही जिंकू, असा दावा भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी केल्यानंतर शिवसेनेचे नेते आणि परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी जोरदार प्रतिउत्तर दिले आहे. ‘युतीच सोडा. वरून ठोका म्हणून आदेश आला तर आम्ही ठोकणार’ असे म्हणुन रावतें यांनी भाजप ला इशारा दिला आहे.

‘युतीच सोडा? आम्हाला वरून आदेश आला ठोका म्हणून तर आम्ही ठोकणार, झोडा असा आदेश आला तर आम्ही झोडायला सुरुवात करणार,’ असं म्हणत दिवाकर रावते यांनी शिवसेना आगामी काळात भाजपविरोधात आक्रमक होणार असल्याचे संकेत दिले. जालना येथे सोमवारी भाजपची प्रदेश कार्यकारीणीची बैठक होणार असून, त्याबाबतची माहिती देण्यासाठी घेतलेल्या पत्रकार परिषदेत दानवे यांनी शिवसेनेबाबत वादग्रस्त विधान केले होते.

महाराष्ट्रात भाजप शिवसेना आणि समविचारी पक्षांनी एकत्र निवडणूक लढावी, मतविभाजन टाळावे अन्यथा काँग्रेस व राष्ट्रवादीला त्याचा फायदा होईल. यामुळे शेवटच्या क्षणापर्यंत आमचा युतीसाठी प्रयत्न असणार आहे, असं दानवे म्हणाले. महाराष्ट्रातील सगळ्या ४८ लोकसभा मतदारसंघात आमची तयारी पूर्ण झाली आहे. महाराष्ट्रातील रायगड व रत्नागिरी वगळता अन्य सगळ्या लोकसभा मतदारसंघात संघटन मंत्री विजयराव पुराणिक आणि आपण स्वतः सगळ्या तयारीचा सखोल आढावा घेतला आहे. महाराष्ट्रात आमच्या विरोधात कितीही पक्ष एकत्र आले तरीही आम्हाला त्याचा काहीही फरक पडणार नाही, असा दावाही रावसाहेब दानवे यांनी यावेळी केला होता.