हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | आगामी उत्तरप्रदेश विधानसभा निवडणुकीसाठी शिवसेनेने देखील कंबर कसली असून उत्तर प्रदेशा मधील सर्वच्या सर्व 403 जागांवर निवडणूक लढवण्याची घोषणा शिवसेनेकडून करण्यात आली आहे. शिवसेनेच्या प्रांत कार्यकारिणीच्या बैठकीत हा मोठा निर्णय घेण्यात आला. यावेळी भाजपवरही गंभीर आरोप करण्यात आले
Shiv Sena to contest for all 403 seats in Uttar Pradesh Assembly elections in 2022. The party has not allied with any other political party as of now but has signaled the possibility of an alliance. pic.twitter.com/qqdZz6FQXH
— ANI (@ANI) September 11, 2021
उत्तर प्रदेश निवडणुकीसाठी युतीबाबत बोलायचं झालं तर, शिवसेनेनं आतापर्यंत कोणत्याही पक्षाशी हातमिळवणी केलेली नाही. परंतु, या सर्व घडामोडींमध्ये एकाच गोष्टीचे संकेत नक्कीच मिळत आहेत की, येणाऱ्या काही दिवसांत शिवसेना युतीसह निवडणूक रिंगणात उतरू शकते.
लवकरात लवकर उत्तर प्रदेशमधील शिवसेना नेत्यांचं एक प्रतिनिधी मंडळ महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची भेट घेऊन या निवडणुकीसंदर्भात अहवाल त्यांना सादर करणार आहे, असं शिवसेनेनं जारी केलेल्या पत्रकात म्हटलं आहे. शिवसेनेने उत्तर प्रदेशात निवडणूक लढवली तर याचा फटका भाजपला बसेल का याबाबत निवडणुकीच्या निकालानंतरच कळणार आहे. कारण दोघांची व्होटबँक ही हिंदुत्व आहे.