सातारा प्रतिनिधी । सकलेन मुलानी
शिवसेनाप्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांनी मराठी माणसाच्या स्वाभिमानासाठी आणि अस्तित्वासाठी त्यांच्या विचारातून प्रभावी झाले. तसेच विरवडे तालुका कराड येथील एक शिवसैनिकाने मागील पंचवीस वर्षातील विविध दैनिकांमध्ये बाळासाहेब ठाकरे व शिवसेनेचे संबंधी प्रसिद्ध झालेल्या बातम्यांच्या संग्रह करण्याचा अनोखा छंद जोपासला आहे.
बाळासाहेब ठाकरे यांच्यावर प्रेम आणि त्यांच्यावर निष्ठा ठेवणारे राज्यात तसेच देशात अनेक लोक भेटतात त्यांच्यापैकीच एक असलेले कराड तालुकयातील विरवडे गावचे महेश पाटील हे आहेत व्यवसायाने टेलर असणाऱ्या महेश पाटील यांनी 1997 मध्ये पुणे येथे सारसबागेत दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांच्या जाहीर सभेत ते पहिल्यांदा उपस्थित राहिले होते तेव्हापासून ते बाळासाहेबांचे निष्ठावान शिवसैनिक झाले 1991 पासुन विरवडे गावातील सेनेच्या शाखेत सक्रिय शिवसैनिक आहेत. त्यांनी शिवाजी पार्कवरील दसरा मेळावा शिवसेनेचा वर्धापन दिन आणि विविध ठिकाणच्या जाहीर सभांना हजेरी लावली तसेच त्यांच्या जाहीर सभा आणि मुलाखतींच्या सीडीचा त्यांनी संग्रह केले आहे.
त्याचबरोबर उद्धव ठाकरे यांनी लिहिलेल्या महाराष्ट्र देशा, पहावा विठ्ठल आणि बाळासाहेब ठाकरे यांचेवर विविध लेखकांनी लिहिलेल्या पुस्तकांचा संग्रह त्यांनी केला आहे. त्यांनी हा छंद गेल्या पंचवीस वर्षापासून जोपासला आहे त्यासाठी त्यांनी आपल्या घरातील एक खोली त्यासाठी राखीव ठेवले आहे या संग्रह केलेल्या खोलीमध्ये विविध फोटो व्यंगचित्रांचा समावेश आहे. 23 जानेवारी 2012 रोजी बाळासाहेब ठाकरे यांच्या वाढदिवसाला पाटील यांनी त्यांना दूरध्वनीवरून संपर्क साधून शुभेच्छा दिल्या होत्या. त्याचे बिल ही त्यांनी जपून ठेवले आहे. त्याच बरोबर मासिक आणि दिवाळी अंकाचा संग्रह त्यांनी केला आहे. सामना सुरू झाला तेव्हापासून महेश पाटील दैनिक सामनाचे वाचक आहेत. त्यातुनच त्यांना दैनिक सामनाच्या जतन करण्याचा छंद लागला.
पहिल्या पंधरा वर्षातील अंक त्यांनी जपून ठेवले होते मात्र वाळवी व पावसामुळे ते खराब झाले सध्या महेश पाटील यांच्याकडे 4 जुलै 1989 पासून ते आजपर्यंत यांनी दैनिक सामनाचे अंक जतन करून ठेवले आहेत. 23 जानेवारी 2012 मध्ये शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची रुद्राक्षतुला करणेत आली त्यावेळी 62 किलो रुद्राक्षांची संख्या 22234 अशी होती. शिवसेना प्रमुखांच्या आशीर्वादीरुपी हे रुद्राक्ष महाराष्ट्रातील शिवसैनिकांना वितरित करण्यात आली. महेश पाटील यांनी मुंबई ला जाऊन दोन रुद्राक्ष घेतले असुन आजही ते भकतीभावाने जपुन ठेवले आहेत. शिवसेना प्रमुखांच्या 1994 ते 2010 पर्यत दसरा मेळाव्यातील झालेल्या भाषणाच्या कॅसेट ही त्यांचेकडे आहेत.
ताज्या बातम्या थेट तुमच्या मोबाईलवर मोफत मिळवण्यासाठी आजच आमच्या 8080944419 या नंबरवर Whatsapp करा आणि लिहा ”Hello News”
हे पण वाचा-