हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । पाकिस्तानचा माजी जलदगती गोलंदाज रावळपिंडी एक्सप्रेस शोएब अख्तर (Shoaib Akhtar) नेहमीच कोणत्या ना कोंत्या कारणांनी चर्चेत असतो. आपल्या प्राणघातक गोलंदाजीने समोरच्या फलंदाजाच्या पोटात गोळा आणणाऱ्या अख्तरची बॉलिंग खेळणं जगातील भल्या भल्या फलंदाजांना जड जायचं. मात्र हाच शोएब अख्तर एका भारतीय फलंदाजाला चांगलंच घाबरयच.. याबाबत खुलासा त्याने स्वतः केलाय. तुम्हाला वाटलं असेल हा फलंदाज म्हणजे सचिन तेंडुलकर किंवा वीरेंद्र सेहवाग असेल… परंतु असं अजिबात नाही. या खेळाडूचे नाव ऐकून खरं तर तुम्हीही हैराण व्हाल…
एका मुलाखतीत बोलताना शोएब अख्तरने सांगितले होते की, त्याला फक्त एका भारतीय फलंदाजाची भीती वाटत होती आणि तो त्याला बाद करू शकला नाही. हा फलंदाज दुसरा कोणी नसून लक्ष्मीपती बालाजी (Lakshmipathy Balaji) होता. अखेरच्या षटकात बालाजी माझी गोलंदाजी फोडून काढायचा आणि मी त्याला कधी आऊट करू शकलो नाही असं अख्तरने म्हंटल. सचिन- सेहवाग- गांगुली यांच्यापेक्षा अख्तरला बालाजीची भीती वाटत असलयाचे पाहून क्रिकेट प्रेमी सुद्धा हैराण झाले असतील.
कोण होता लक्ष्मीपती बालाजी-
लक्ष्मीपती बालाजी हा भारतीय क्रिकेट संघाचामाजी जलदगती गोलंदाज आहे. आपल्या जबरदस्त बॉलिंग शैलीसाठी बालाजी ओळखला जात होता. 2002 मध्ये त्याने भारताकडून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केलं. आपल्या कारकिर्दीत बालाजीने भारताकडून 8 कसोटी, 30 एकदिवसीय आणि 5 टी-20 आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत. याशिवाय बालाजीने IPL मध्ये सुद्धा एकूण ७३ सामने खेळले आहेत. यामध्ये त्याने ७६ बळी घेतले. या दरम्यान, २४-५ अशी त्याची सर्वोत्तम खेळी होती.