Shoaib Sania Divorce : पाकिस्तानी क्रिकेटपटू शोएब मलिकने (Shoaib Malik) काल तिसरं लग्न केले. अभिनेत्री सना जावेदसोबत त्याने लग्नगाठ बांधून सर्वानाच आश्चर्याचा धक्का दिला. खरं तर शोएब मलिक आणि सानिया मिर्झा (Sania Mirza) यांच्या घटस्फोटाच्या चर्चा गेल्या वर्षभरापासून सुरु होत्या, पण दोघांनीही याबाबत अधिकृतरीत्या कधीच काही जाहीर केलं नाही. पण आता मलिकच्या तिसऱ्या लग्नामुळे सर्व काही स्पष्ट झालं आहे. शोएब- सानियाच्या घटस्फोटाचे नेमकं कारण काय होते हे आज आपण जाणून घेऊयात.
मलिकच्या सततच्या अफेअरने वैतागली होती सानिया – Shoaib Sania Divorce
पाकिस्तानी मीडिया रिपोर्ट्सनुसार, सानिया मिर्झाने 2022 च्या अखेरीस घटस्फोटासाठी अर्ज दाखल केला आहे. जिओ न्यूजनुसार, शोएब मलिकच्या एक्स्ट्रा मॅरिटल अफेअर्समुळे सानिया नाराज झाली होती. सुरुवातीला तिने हे प्रकरण सोडवण्याचा प्रयत्न केला, पण शोएबच्या बेवफाईमुळे ती खूश नव्हती. शोएब मलिकचे नाव अनेक महिलांशी जोडले गेले होते. मधल्या काळात सुद्धा आयेशा उमरचे नाव त्याच्या सोबत जोडलं गेलं होते. या एकूण सर्व प्रकारामुळे सानियाने घटस्फोटाचा अर्ज दाखल (Shoaib Sania Divorce) केला. मात्र, सानियाने अर्ज कोठे दाखल केला आणि त्यावर अजून निर्णय झाला आहे की नाही, याचा उल्लेख त्या अहवालांमध्ये करण्यात आलेला नाही.
हे पण वाचा : तू सानियाचा विश्वासघात केलास!! दुसरं लग्न करताच मलिकला नेटकऱ्यांनी धुतलं
शोएबच्या तिसऱ्या लग्नानंतर त्याचे कुटुंबीय सुद्धा खुश नाहीत असेही या रिपोर्ट म्हणून सांगण्यात आलं आहे. सना जावेद सोबतच्या लग्नसोहळ्याला शोएबच्या कुटुंबातील एकही व्यक्ती उपस्थित नव्हती. शोएबच्या कुटुंबियांना हा घटस्फोट (Shoaib Sania Divorce) मान्य नव्हता. त्यामुळे दोघांच्या कुटुंबीयांनी यावर तोडगा काढण्यासाठी 2022 च्या अखेरीस दुबईला गेले होते. त्यावेळी शोएबच्या कुटुंबीयांनी त्याला समजवले तसेच नात्यावर आणखी मेहनत घ्यायला सांगितली, तरीही त्याने आपले अफेअर्स असेच सुरु ठेवलं आणि आता तर थेट तो लग्नच करून मोकळा झालाय.
दरम्यान, शोएब मलिकने सानिया सोबत 2010 मध्ये लग्न केलं होते. 2009-2010 मध्ये ऑस्ट्रेलियातील होबार्टमध्ये त्यांची भेट झाली होती. त्यांच्या ओळखीचे रुपांतर मैत्रीत झाले आणि जवळपास 5 महिने एकमेकांना ओळखल्यानंतर दोघांनी 2010 मध्ये लग्न करण्याचा निर्णय घेतला होता. सानियाने एका पाकिस्तानी व्यक्तीशी लग्न केल्यामुळे लोकांनी तिच्यावर तेव्हा टीकाही केली होती. दोघांना इजहान नावाचा मुलगाही आहे. मात्र मागील १-२ वर्षात त्यांच्यात काहीतरी बिनसलं असल्याच्या चर्चा होत्या.