नवी दिल्ली । तुम्ही SBI क्रेडिट कार्ड वापरत असाल तर तुमच्यासाठी एक वाईट बातमी आहे. वास्तविक, आता तुम्हाला SBI च्या क्रेडिट कार्डद्वारे केलेल्या EMI ट्रान्सझॅक्शनसाठी जास्त पैसे द्यावे लागतील. SBI कार्ड्स आणि पेमेंट सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेड (SBICPSL) ने जाहीर केले आहे की, EMI ट्रान्सझॅक्शनसाठी, कार्डधारकाला आता 99 रुपये प्रोसेसिंग चार्ज आणि त्यावर टॅक्स भरावा लागेल. हा नवा नियम 1 डिसेंबरपासून लागू होणार आहे.
व्याज शुल्काव्यतिरिक्त भरावे लागेल प्रोसेसिंग चार्ज
SBICPSL रिटेल आउटलेट्स आणि Amazon आणि Flipkart सारख्या ई-कॉमर्स वेबसाइटवर केलेल्या सर्व EMI ट्रान्सझॅक्शनसाठी प्रोसेसिंग चार्ज आकारेल. हा चार्ज खरेदीचे EMI मध्ये रूपांतर करण्यावर आकारण्यात येणाऱ्या व्याजाच्या शुल्काव्यतिरिक्त आहे. कंपनीने आपल्या ग्राहकांना ईमेलद्वारे नवीन शुल्काची माहिती दिली आहे.
प्रोसेसिंग चार्जची माहिती कधी दिली जाईल ?
EMI मध्ये यशस्वीरित्या रुपांतरित झालेल्या ट्रान्सझॅक्शनवर प्रोसेसिंग चार्ज लागू आहे. 1 डिसेंबरपूर्वी केलेल्या कोणत्याही ट्रान्सझॅक्शनला या प्रोसेसिंग चार्जमधून सूट दिली जाईल. रिटेल आउटलेट्सवर खरेदी करताना कंपनी कार्डधारकांना EMI ट्रान्सझॅक्शनवरील प्रोसेसिंग चार्जची माहिती चार्ज स्लिपद्वारे देईल. ऑनलाइन EMI ट्रान्सझॅक्शनसाठी, कंपनी पेमेंट पेजवर प्रोसेसिंग चार्जविषयी माहिती देईल. EMI ट्रान्सझॅक्शन रद्द झाल्यास, प्रोसेसिंग चार्ज परत केले जाईल. मात्र, प्री-क्लोझरच्या बाबतीत ते परत केले जाणार नाही. EMI मध्ये रूपांतरित केलेल्या ट्रान्सझॅक्शनसाठी रिवॉर्ड पॉइंट लागू होणार नाहीत.