Thursday, February 2, 2023

BREKING NEWS गोकुळ दूध ः सत्ताधाऱ्यांना झटका, सतेज पाटील यांच्या आघाडीला तिसराही विजयी काैल

- Advertisement -

कोल्हापूर | गोकुळ दूध संघाची मतमोजणीत पालकमंत्री सतेज पाटील यांच्या विरोधी राजर्षी शाहू शेतकरी आघाडीला सलग तिसऱ्या जागेवरही विजय मिळाला आहे. त्यामुळे सत्ताधारी यांच्या सत्तेला हादरे देण्यास सुरूवात झाली आहे.

सुरूवातीला सुजित मिनचेकर 346, अमर पाटील 436 या दोन उमेदवारांच्या विजयानंतर तिसरी जागाही विरोधी गटाला मिळाली आहे. बयाजी शेळके 239 मतांनी विजयी झाले आहेत. त्यामुळे विरोधी गट सत्ता मिळविणार का याकडे आता राज्याचे लक्ष लागून राहिले आहे.

- Advertisement -

या निवडणुकीच्या निमित्ताने सत्तारूढ राजर्षी शाहू आघाडी व विरोधी राजर्षी शाहू शेतकरी आघाडीच्या कार्यकर्त्यांमध्ये टोकाची ईर्ष्या दिसून आली. या निवडणुकीची मतमोजणी आज सकाळी आठपासून रमणमळा येथील महसूल कल्याण निधीच्या सभागृहात सुरू झाली आहे. या निकालाबाबत जिल्ह्यात कमालीची उत्सुकता आहे. दुपारपर्यंत निकालाचा कल स्पष्ट होईल.