धक्कादायक : 11 वर्षीय मुलाला बुडवून मारले, 8 महिन्यानंतर एका महिलेसह 5 मुलांवर खुनाचा गुन्हा

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

औरंगाबाद : तलावात बुडून मृत्युमुखी पडलेल्या मुलाचा अपघात झाल्याचा संशय व्यक्त करत एका आईने न्यायालयात धाव घेतली. त्यावर सुनावणी होऊन आठ महिन्यानंतर एका महिलेसह पाच अल्पवयीन मुलांवर मंगळवारी सातारा पोलिस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला.

पतीपासून विभक्त राहणाऱ्या प्रतिपादन दत्ता शिंदे वय 38, रा.विटखेडा या मोलमजुरी करून कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवतात. 25 ऑगस्ट 2020 रोजी त्यांचा मुलगा रोहन (वय 11) मित्रांसोबत वाल्मी परिसरात गेला होता. तो तलावात बुडून मृत्युमुखी पडला. या घटनेनंतर प्रतिभा या लहान मुलगा यशराजसह (वय 9) वर्ष वीट खेड्यातील आईकडे राहण्यास गेला. दुःखातून सावरण्याल्या नंतर त्यांनी रोहनच्या काही मित्रांची भेट घेतली. तेव्हा प्रत्यक्ष घटना बघितलेल्या मुलांनी रोहनला बुडवल्याने त्याचा मृत्यू झाल्याचे सांगितल्यावर धक्काच बसला. त्यांनी सातारा पोलिसांकडे तक्रार केली. तेव्हा बुडवून मारणाऱ्या एका मुलाच्या कुटुंबाने त्यांना धमकावणे सुरू केले. या प्रकरणात खुनाचा गुन्हा दाखल होण्यासाठी प्रतिभा यांनी न्यायालयात याचिका दाखल करत लढा सुरू केला.

प्रथमवर्ग न्यायदंडाधिकाऱ्यांनी कलम 156 (6) प्रमाणे सातारा पोलिसांनी या प्रकरणात कुणाचा गुन्हा दाखल करावा असे आदेश दिले. त्यानंतर मंगळवारी चार अल्पवयीन मुले व रोहनला पाण्यात बुडून मारणाऱ्या आरोपी मुलाच्या आईवर गुन्हा दाखल करण्यात आला. 25 ऑगस्ट रोजी रोहन सोबत वाद झाल्याने 16 वर्षीय विकीने हात पकडून त्याला तलावात बुडवले. विकीने बाहेर येऊन त्यांच्या तीन मित्रांना धक्का दिल्याने तेही तलावात पडली. रोहनने बाहेर येण्याचा प्रयत्न केला. मात्र, विकीने त्याची डोके हाताने पाण्यात दाबले, श्वास गुदमरून तो मरण पावला. ही घटना कोणी घरी सांगितली तर तुम्हालाही जीवे मारून टाकु, अशी धमकी विकीने दिली. ही माहिती लपवून विकीला पाठिंबा देणाऱ्या इतर चार जणांना देखील सहआरोपी करण्यात आले आहे.

Leave a Comment