औरंगाबाद: जोगेश्वरी येथे अल्पवयीन मुलीने जीवन संपविले. सानिया शेख ( वय 15) घरात कोणी नसताना बुधुवारी दुपारी 1 वाजेच्या सुमारास घराच्या छताला असलेल्या लोखंडी अँगलला दोरीच्या साहाय्याने गळफास घेतला. त्यात तिचा मृत्यू झाला. तिच्या आत्महत्येचे नेमके कारण अद्यापही समजू शकले नाही.
शेख सत्तार हे पत्नी व मुली सह जोगेश्वरी येथे किरायच्या घरात राहतात. बुधवारी सकाळी शेख सत्तार व पत्नी हनीफा हे कामासाठी कंपनीत गेले होते. त्यावेळी सानिया व तिचा लहान भाऊ घरात होते. दरम्यान इर्शाद हा खेळण्यासाठी घराबाहेर गेल्यानंतर सानियाने घरात गळफास घेतला.
घटनेची माहिती मिळताच पोलीस उपनिरीक्षक प्रशांत गंभीरराव, सहायक फौजदार काकासाहेब जगदाळे, पोलीस अंमलदार तुकाराम पवार, सोनाजी बुट्टे यांनी घटनास्थळी येऊन सानियास बेशुद्ध अवस्थेत उपचारासाठी घाटी दवाखान्यात दाखल केले. डॉक्टरांनी तिला मयत घोषित केले. यां प्रकरणी एमआयडीसी वाळूज ठाण्यात आकस्मात मृत्यूची नोंद घेण्यात आली आहे.