औरंगाबाद : शहरातील घाटी रुगणालयात तारीख संपलेले केमिकल तेथील लॅबोरेटरीमध्ये वापरल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. घाटी रुगणालय कोरोना काळातील महत्वाचे आणि सर्व शासन सवलतीयुक्त रुग्णालय आहे. म्युकोरमायकोसिस आणि कोरोनावर शहरातील बहुतांश लोक इथेच उपचार घेतात. या पार्श्वभूमीवर घाटी रुगणालयत तारीख संपलेले केमिकल सापडल्याने एकच खळबळ उडाली आहे.
हाती आलेल्या माहिती नुसार, कोरोना आणि म्युकोरच्या टेस्ट ज्या लॅबमध्ये केल्या जातात. त्याच लॅबमध्ये चक्क तारीख संपलेले केमिकल वापरले जातात. असा आरोप भारत फुलारे यांनी केला आहे. त्यांनीच या प्रकरणाला वाचा फोडली आहे. हा प्रकार एक गुन्हा असून. हे प्रकरण मेडिकल निग्लिजिन्स असून संबंधितांवर गुन्हा दाखल करावे अशी मागणी केली आहे.
दरम्यान, हा प्रकार समोर आल्या नंतर घाटी रुगणालयाच्या अधिष्ठाता कानन येळीकर यांनी प्रतिक्रिया दिली. त्या म्हणाल्या, ” तारीख संपलेले केमिकल जेव्हा आम्ही नष्ट करतो तेव्हा त्याचे रिकामे खोके बाहेर पडलेले असतात तेच या व्हिडिओ मध्ये दिसत आहे. आम्ही कधीही तारीख संपलेले केमिकल वापरत नाही.” या प्रकारामुळे औरंगाबादकरांच्या मनात कोरोना आणि म्युकोर रिपोर्ट योग्य होते का? असा प्रश्न निर्माण झाला आहे.